साध्या पद्धतीने होणार श्रीरामजन्मोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:55+5:302021-04-21T04:16:55+5:30
राम नवमी : भाविकांनी दर्शनासाठी बंदी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही राम नवमी निमित्त ...
राम नवमी : भाविकांनी दर्शनासाठी बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही राम नवमी निमित्त शहरातील विविध श्रीराम मंदिरांमध्ये साध्या पद्धतीने श्रीरामजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. पाच भाविकांच्या उपस्थितीतच जन्मोत्सव सोहळा साजरा होणार असून, नागरिकांना शासनाच्या सूचनेनुसार मंदिरे बंद असल्याने, दर्शनासाठीही बंदी राहणार असल्याचे मंदिर प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
नवीन बस स्थानका समोरील चिमुकले श्रीराम मंदिरात सकाळी पाच वाजता महा अभिषेक होणार आहे. त्या नंतर सात वाजता श्रीरामाची महाआरती होणार आहे. त्यानंतर ११ वाजता हभप दादा महाराज जोशी यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी बारापर्यंत कीर्तन चालून, बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा पाळणा हलवून साजरा होणारा आहे. हा सोहळा फक्त पाच लोकांच्या उपस्थितच साजरा होणार आहे. कुठल्याही बाहेरील नागरिकाला मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार नाही. नागरिकांनी घरी बसून श्रीरामाचे नाम स्मरण करून, श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचे आवाहन हभप ऋषिकेश महाराज जोशी यांनी केले आहे.