डीजे बंद करून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:11 AM2017-09-02T01:11:04+5:302017-09-02T01:13:09+5:30

चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रूक या आदर्श गावाने सुरू केलेल्या परंपरेचे परिसरात होतेय स्वागत

Shutting the DJ and immerse the idol of Shree | डीजे बंद करून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन

डीजे बंद करून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन

Next
ठळक मुद्देघुमावल बुद्रूक या आदर्श गावाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत यंदाही ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम सुरू ठेवला.गणेशोत्सव काळात वृक्षारोपण, पथनाटय़, खो-खो, कबड्डी स्पर्धा व जनप्रबोधनपर व्याख्यान आदी समाजोपयोगी कार्यक्रमही राबवले. अशा या विविध उपक्रमांमुळे हे गाव परिसरात चर्चेत आले आहे.बँडवाजा, ढोल ताशे, डिजे बंद करून गणेश मूर्तीचे विसजर्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सावता हरीभक्त भजनी मंडळाने टाळमृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पाच्या मूर्तीचे प्रचंड उत्साहात विसर्जन केले. बँड-डिजे व इतर खर्च न करता सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने महाप्रसाद व भंडा:याचे आयोजन करण्यात आले. हा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, असा पायंडा या गावाने सुरू केले आहे.

लोकमत ऑनलाईन चोपडा, जि. जळगाव, दि. 1 : आदर्श गाव असलेल्या घुमावल बुद्रूक, ता चोपडा येथे ‘एक गाव एक गणपती’ अंतर्गत डीजे व ढोलताशांना दूर सारत भजनी मंडळाच्या गजराने शुक्रवारी विसजर्न करण्यात आले. संपूर्ण गावाने एकाच गणपतीची स्थापना केली होती. गणेशोत्सवाच्या दिवसात अनेक जनप्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. हा आदर्श इतर गावांनीही घेण्यासारखा आहे. दरम्यान, सात दिवसांच्या काळात या गावातील गणेश मंडळाला तहसीलदार दीपक गिरासे , नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव नंदूरकर आदींनी भेटी दिली आणि या उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले.

Web Title: Shutting the DJ and immerse the idol of Shree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.