भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीत २७ एप्रिल ते २० जून दरम्यान तब्बल २४ कोरोना बाधीत रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत. सिंधी कॉलनी तूर्त कोरोनामुक्त झाली आहे. मात्र वैद्यकीय भाषेत २८ दिवसापर्यंत पुढे रुग्ण न आढळल्यास संपूर्ण कोरोनामुक्त परिसर होतो.शहरात पहिला रुग्ण समतानगर व दुसरा रुग्ण २७ एप्रिल रोजी सिंधी कॉलनी येथे आढळून आला होता. त्यानंतर सातत्याने सिंधी कॉलनी येथे रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. शेवटचा पेशंट १० जून रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर २० जूनला संपूर्ण उपचार घेतल्यानंतर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सिंधी कॉलनी तूर्त कोरोनामुक्त झाली आहे. मात्र वैद्यकीय भाषेत येथून पुढे २८ दिवस एकही रुग्ण कॉलनीत आढळला नाही तर खऱ्या अर्थाने कोरोनामुक्त होते, असे वैद्यकीय अधिकारी कीर्ती फलटणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना आधीही किडनी व इतर व्याधी असताना हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते.कॉलनीतील परिसरात कॉलनी परिसरातील नागरिकांनी गेल्या दोन महिन्यातील वाईट अनुभव घेऊन भविष्यात रुग्ण आढळणार नाही यासाठी दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले होते व सद्य:स्थितीत नाही त्या परिसरातील लोकांनी अति दक्षता घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
भुसावळातील सिंधी कॉलनी झाली कोरोना मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 4:15 PM
शहरातील सिंधी कॉलनीत २७ एप्रिल ते २० जून दरम्यान तब्बल २४ कोरोना बाधीत रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत.
ठळक मुद्दे२४ रुग्ण उपचार घेऊन परतले घरीनागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे