सर आली धावून, पुराचे पाणी गेले वाहून....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:15 AM2021-07-26T04:15:56+5:302021-07-26T04:15:56+5:30

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जवळच असलेला व भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ओझरखेड तलावात हतनूर ...

Sir came running, carried away the flood water .... | सर आली धावून, पुराचे पाणी गेले वाहून....

सर आली धावून, पुराचे पाणी गेले वाहून....

Next

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जवळच असलेला व भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ओझरखेड तलावात हतनूर धरणाचे वाया जाणारे पाणी केव्हा सुटणार ? आतापर्यंत धरणाचे तीन पूर वाहून गेले. तरीदेखील मात्र ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात आले नसल्याने या धरणात पाणी केव्हा सुटणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.केवळ कोट्यवधी रुपये धरणाच्या नावाने खर्च करावे, परंतु त्याचा लाभ जर मिळत नसेल तर काय फायदा धरण बांधायला सात आठ वर्षे झाले, परंतु अद्यापहीशेतकर्‍यांच्या शेतात पाणी गेले नाही अशी खंत येथील शेतकरी आनंदराव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

आतापर्यंत पावसाळ्यात यातील अतिरिक्त पुराचे पाणी वाहून गेले. सर आली धावून, पाणी गेले वाहून...अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र ओझारखेड धरणात पाऊस पाणी न साठवले गेल्यामुळे निराश होत आहे. गत वर्षीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केळी बागायती लागवड केली होती. मागील वर्षी पाणी तलावात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मोटारी जळाल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यासाठी तरीदेखील पाण्याचे यंदाही पाणी सुटणार की नाही याची शंका वाटत आहे.

याचबरोबर भुसावळ ,बोदवड, मुक्ताईनगर, तालुक्यातील‍ सुमारे ६० गावांना शेतीसाठी पाणी मिळणार होते ते अद्यापही मिळाले नसून ते मिळावे, अशीही मागणी आहे. यासाठी पाइपलाइनने नियोजन करण्याचे करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांनी पाइपलाइनने आर्थिक भुर्दंड सहन करत पाइपलाइन केली मात्र सर्वसामान्य शेतकरीदेखील अजून या लाभापासून दूर आहे. त्यांच्यासाठीदेखील पाइप लाइनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यासंदर्भात मागील वर्षीदेखील शेतकऱ्यांच्या मागणी असताना पाणी सोडले नव्हते. सध्या हातनूर धरणाचे गेल्या आठवड्यात बारा दरवाजे, आता गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण क्षमतेने ४१ दरवाजे धरणाची खुले असताना हे पाणी वाया जात आहे. पूर्णा नदीचे यंदा पावसाळ्याचा पूर्णा नदीचे तिसरा पूर वाहून गेलेला आहे. ४१ दरवाजे खुले केल्यामुळे तेच पाणी रोखून ओझरखेडा तलावात आत्ताच टाकले असते तर फार सोयीचे झाले असते.

दरवर्षी साधारणत: पंधरा ऑगस्ट ला हतनूर धरणाचे दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे धरणाचे पाणी साठवले जाते व ते पाणी शेतीसाठी उपयुक्त ठरते. मात्र ओझरखेडा तलाव हा त्या पाण्यावर अवलंबून असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याची जर नियोजन आतापासूनच केले तर भविष्यात हे वाया जाणारे पाणी उपयुक्त ठरेल. पुढे पाऊस कमी झाला तरी पाणी साठवणे कठीण होऊ शकते. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बागायती लागवड केली आहे.

नियोजन चुकले तर त्यांच्या बागायतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून दरवाजे आता खुले असताना तेच पाणी आतापासूनच अडकवून ओझरखेडा तलावात टाकली तर शेतकऱ्यांना पुढे दिलासा मिळेल. याची दखल घ्यावी, अशी मागणी यापूर्वीदेखील शेतकऱ्यांनी केली असल्याचे सांगितले.

शेतकरी प्रतिक्रिया

शेतीला पाणी नसेल तर सातबाराच्या उताऱ्यावर लाल शेरा मारलेला आहे तो कमी करावा. विनाकारण शेतकऱ्यांना संबंधित विभागाशी उंबरठे झिजवावे लागतात .कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील जर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नसेल तर नुसतेच धरणे बांधून काय फायदा. केवळ नवीन धरणाच्या नावाने शासनाचे पैसे उपटायचे का? शासनाने यावर गंभीर विचार करावा. शेतकऱ्यांना लिफ्टिंगचे पाणी उपलब्ध करून द्यावे. हरताळेच्या जुन्या तलावांना पुनरुज्जीवित करावे. सर्वसामान्य व लहान शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. तेव्हा खऱ्या अर्थाने या ओझरखेडा तलावाचा धरणाचा व इतर धरणे बांधण्याचा उद्देश सफल होईल.

आनंदराव देशमुख, शेतकरी तथा मुक्ताईनगर पंचायत समिती अजी उपसभापती हरताळा.

फोटो कॅप्शन

ओझरखेडा तलावात अद्यापही पाणी पडले नसल्या ने शेतकऱ्यांच्या पाइपाइन, मोटारी उघड्या पडल्या आहे. तलाव असा कोरडा पडला आहे.

Web Title: Sir came running, carried away the flood water ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.