नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी दर तीन तासांनी वाजणार सायरन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:37 PM2020-04-05T17:37:01+5:302020-04-05T17:38:09+5:30
कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दर तीन तासांनी स्वच्छ हात धुवावेत यासाठी पालिकेचा भोंगा (सायरन) दर तीन तासांनी वाजणार आहे.
पारोळा, जि.जळगाव : कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दर तीन तासांनी स्वच्छ हात धुवावेत यासाठी पालिकेचा भोंगा (सायरन) दर तीन तासांनी वाजणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. कोणीही घराबाहेर पडू नये. तोंडाला मास्क लावावा, हात स्वच्छ धुवावेत अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या. या वेळी लोकांनी ठरावीक तासांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी पालिकेकडून जनतेला सूचना व्हावी यासाठी दिवसा दर तीन तासांनी पालिकेचा भोंगा वाजेल. भोंगा वाजला की सर्वांनी हात स्वच्छ पाण्याने सॅनिटीझर वापरून धुवावेत, अशी कल्पना नगराध्यक्ष करण पवार, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी मांडली आहे. ६ एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पालिकेचा सायरन वाजला की, नागरिकांनी हात धुवावेत, असे आहवान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.