शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

पारोळ््याजवळ अपघातात सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:41 PM

चालकास दरवाजा तोडून काढले बाहेर

पारोळा, जि. जळगाव : आशिया महामार्ग ४६ वर पारोळा-जळगाव रस्त्यावर कुटीर रुग्णालयाजवळ ट्रक आणि कोंबड्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची समोरासमोर धडक होऊन सहा जण जखमी झाले. त्यात दोन जण गंभीर आहेत. त्यांच्यावर पारोळा कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.२८ रोजी दुपारी ४.४५ वाजता आशिया महामार्गावर कुटीर रुग्णालयाजवळ सांताक्रूझ, मुंबई येथून घरसामानाचे साहित्य भरून बाळापूरकडे (शेगांव) निघालेला ट्रक क्र.(एम.एच. ४८ ए .वाय. ९८६७) हा पारोळ्याकडून जळगावकडे जात असताना समोरुन येणारे कोंबड्या वाहतूक करणारे वाहनामध्ये (एम.एच. १९ बी.एम.४०२६) धडक झाल्याने ट्रक रस्त्याच्याकडेला खाली उतरून खड्ड्यात पडला. चालक अब्दुल रशीद व बाजूला बसलेला महमद अदनान या दोघांना ट्रकचे दोन्ही बाजूचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. अपघातात ट्रकमधील रफिक अब्दुल (६२), अब्दुल रशीद (४९), मोहम्मद अदनान (१७), फैमीदा अहमद (४३) हे जखमी झालेत तर पोल्ट्रीच्या वाहनात एरंडोल येथून लग्न आटोपून नाशिक येथे घरी परत जाणारे एका कुटुंबातील सदस्य होते. भटू प्रताप पवार (४२), धनराज गंगाराम चव्हाण (४४) हे दोन्ही जण जबर जखमी झालेत. या सर्व जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे, डॉ.जैन, राजू वानखेडे, राजू सोनार व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार केले व रुग्णवाहिकेतून प्रमोद पाटील यांनी या जखमींना धुळे सामान्य रुग्णालयात दाखल केले.कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनात प्रवाशी म्हणून बसलेले सिद्धांत धनराज चव्हाण या चार महिन्यांच्या बालकाला साधे खरचटलेदेखील नाही. या सोबतच सृष्टी धनराज चव्हाण (८), रुपाली भटू पवार, छाया भटू पवार, अश्विनी धनराज चव्हाण आदी जण या अपघातातून बचावले. अपघाताचे वृत्त समजताच पो.हे.कॉ.बापू पाटील, विनोद साळी, इकबाल शेख व वाहतूक पोलिसांनी मदत कार्य व वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव