तेव्हा १३० दिवसात ७ हजार आता ५४ दिवसात ४२ हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:05+5:302021-04-12T04:14:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात एक वर्ष १३ दिवसांनी कोरोना रुग्णसंख्येने तब्बल १ लाखांचा आकडाही ओलांडला आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात एक वर्ष १३ दिवसांनी कोरोना रुग्णसंख्येने तब्बल १ लाखांचा आकडाही ओलांडला आहे. यात दुसऱ्या लाटेतील रुग्णवाढीचा वेग प्रचंड असून शेवटच्या ५४ दिवसात तब्बल ४२ हजार ९२६ रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेतील हे ५४ दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण गेल्याचे गंभीर चित्र आहे.
७ ऑक्टोबर रोजी पहिला ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता.
जिल्ह्यात एकूण रुग्णांच्या ११ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख खाली उतरला होता. तो १५ फेब्रुवारीपर्यंत स्थिर होता. तेव्हापासून रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला व ५४ दिवसातच परिस्थिती बिकट झाली. यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यासह मृतांची संख्याही चिंताजनक असून ती वाढली आहे.
रुग्णसंख्येचे विश्लेषण
पहिले ५० हजार रुग्ण : ७ ऑक्टोबर २०२०
एक लाख रुग्ण : १० एप्रिल २०२१
७ ऑक्टोबर ते १४ फेब्रुवारीपर्यंत : ७४९३
१५ फेब्रुवारी ते १० एप्रिल : ४२९२६
टक्केवारीत रुग्णसंख्या
बरे झालेले ८६.५९ टक्के
उपचार सुरू असलेल ११. ६४ टक्के
मृत्यू दर १. ७६ टक्के
जळगाव शहर, चोपड्यात अधिक रुग्ण
दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा जळगाव शहर व चोपडा तालुुक्यात समोर आला. या दोन ठिकाणी सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली असून सद्यस्थितीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण याच तालुक्यात आहेत. अन्य तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. जळगाव शहरात चाचण्या वाढताच रुग्णवाढ समोर आली आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पॉझिटिव्हीटी कमी झाल्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत.
पहिले ५० हजार आणि दुसरे ५० हजार रुग्ण आणि फरक
पहिली लाट
१०००० १० ऑगस्ट
२०००० २० ऑगस्ट
३०००० ४ सप्टेंबर
४०००० १५ सप्टेंबर
५०००० ७ ऑक्टोबर
दुसरी लाट
५०००० ७ ऑक्टोबर
६०००० २६ फेेब्रुवारी
७०००० १४ मार्च
८०००० २४ मार्च
९०००० २ एप्रिल
१००००० १० एप्रिल
संसर्ग अधिक धोकाही अधिक
दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग हा प्रचंड असल्याचे समोर आले आहे. या लाटेत एक व्यक्ती नव्हे तर कुटुंबाच्या कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात समोर आले हेाते. शिवाय मार्चच्या मध्यंतरी शहरातील बाधितांचे प्रमाण हे थेट ४० टक्क्यांवर पोहोचले होते. हे प्रमाण आता २५ टक्क्यांवर आले आहे. मात्र, नियमित बाधितांची संख्या ही गेल्या दहा ते बारा दिवसांपासून ११०० पेक्षा अधिकच नोंदविली जात आहे.