तर पुजारा, रहाणेचा पर्याय शोधावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:03+5:302021-08-15T04:20:03+5:30

सलामीवीर शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या दुखापतीमुळे संघाला दुखापत झाल्यामुळेच तो नशीबवान ठरला. त्याला संधी मिळाली. स्विंग ...

So Pujara, we have to find an alternative to stay | तर पुजारा, रहाणेचा पर्याय शोधावा लागेल

तर पुजारा, रहाणेचा पर्याय शोधावा लागेल

Next

सलामीवीर शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या दुखापतीमुळे संघाला दुखापत झाल्यामुळेच तो नशीबवान ठरला. त्याला संधी मिळाली. स्विंग आणि सीम गोलंदाजांना मदत करणाऱ्या परिस्थितीत तो संघाचा सर्वात चांगला फलंदाज ठरला आहे. तो कसोटी क्रिकेटसाठी अपरिचित आहे असे नाही. पण चांगल्या सुरुवातीनंतर त्याचा फॉर्म घसरला आणि त्याने स्थान गमावले होते. ट्रेंट ब्रिज कसोटीत अभिमन्यू ईश्वरन होता. तसेच श्रीलंकेहून पोहचलेल्या पृथ्वी शॉ याचा विलगीकरणाचा कालावधी संपलेला नव्हता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गमावल्यानंतर त्यांनी रवी शास्त्री आणि कोहली यांनी राहुलच्या अनुभ‌वावर भर दिला. रोहितशी नीट ताळमेळ ठेवल्याने त्याची खेळी चमकदार झाली.

राहुल आणि रोहितने या मालिकेत आतापर्यंत ९७, ३४, १२६ धावांची भागीदारी केली. रोहितने स्ट्रोकमध्ये चाणाक्षपणा दाखवला आहे, तर राहुलने परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची आणि खेळण्याची क्षमता दाखवली आहे.

मात्र मधल्या फळीचे अपयश झाकण्यासारखे नाही. पुजारा आणि रहाणे प्रमाणेच कोहलीची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी त्यांना पुरेशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

ट्रेंट ब्रिजवरील पहिल्या कसोटीत पहिल्या डावाची आघाडी ही रवींद्र जडेजामुळे मिळाली. लॉर्ड्सवर देखील भारताचा बाद दोन बाद २६७ वरून सर्व बाद ३६४ वर घसरला.

एक ते सात क्रमांकावरील फलंदाजांची चॅम्पियनशीपच्या फायनची कामगिरी आणि या मालिकेतील तीन डाव हे मधल्या फळीच्या कमकुवत पणावर प्रकाश टाकतात. सर्वाधिक धावा राहुल (२३७) रोहित (१९५) उर्वरीत फलंदाजांमध्ये ऋषभ पंत (१०७) आणि जडेजा (१२७) हे आघाडीवर आहे. तर कोहली (९९) पुजारा(४८) रहाणे (७०) हे अपयशी ठरले. त्यामुळे भारत डब्लुटीसी फायनलमध्ये पराभूत झाला आणि इंग्लंडला भारतावर दबाव निर्माण करता आला.

अँडरसनने शानदार कामगिरी केली आणि रॉबिन्सनने त्याला साथ दिली दिली. मात्र अपेक्षेनुसार भारतीय फलंदाजांचे हे त्रिकुट इंग्लंडला नमवु शकेल का हा प्रश्न आहे. सलामीवीरांनी केलेल्या धावांचा फायदा भारताला घेता आला नाही.

कोहलीने डब्लुटीसी फायनलमध्ये ४४ धावा केल्या होत्या. लॉर्ड्सवर पहिल्या डावात फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र रहाणे आणि पुजारा यांचे अपयश कायम राहिले. हे दोघेही अनुभ‌वी आहेत. मात्र जर त्यांना अपेक्षीत धावा करता येत नसतील तर संघ व्यवस्थापनाला पर्याय शोधावे लागतील.

Web Title: So Pujara, we have to find an alternative to stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.