एरंडोल, जि.जळगाव : येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. शहरात विविध जंतुनाशके व सॅनिटयजर्सद्वारे फवारणी करून शहर सॅनिटाईज करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.शहरात गटारीवर मलेरीयन आॅईलची हातपंपाद्वारे फवारणी करण्यात आली. तसेच सोडियम हायपोक्लोराइटची हातपंपाद्वारे फवारणी करण्यात आली. नगराध्यक्ष रमेश परदेशी व मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी तत्परता दाखवली. तत्काळ फवारणी यंत्र खरेदी करून सदर फवारणी यंत्र ट्रॅक्टर वर कार्यान्वित करून सदर फवारणी यंत्राद्वारे पुन्हा सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात आली.अग्निशमन वाहनाद्वारे शहरातील प्रमुख रस्ते मारवाडी गल्ली परिसर, पंचायत समिती व न्यायालय परिसर, आठवडे बाजार परिसर, दरवाजा परिसर, चौक ते बाखरूम बाबा परिसर, आदी. गर्दी होणाऱ्या भागांमध्ये सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात आली.एरंडोल शहरवासीयांनी लॉकडाऊन कालावधीत आपापल्या घरीच बसून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले आहे.
एरंडोल पालिकेतर्फे सॅनिटायझर्स फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 3:41 PM
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनाशहर सॅनिटाइज केल्याचा पालिकेचा दावा