विराटला लवकर बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाज सर्वात माहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:08 PM2017-08-27T16:08:01+5:302017-08-27T21:40:43+5:30
पल्लेकल येथील दुस:या वन डे सामन्यात धनंजयने त्याचा अवघ्या 4 धावांवर त्रिफळा उडवला
ऑनलाईन लोकमत / ललित झांबरे
जळगाव, दि. 27 - विराट कोहली सद्यस्थितीत जगातील आघाडीच्या यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. 192 वन डे सामन्यात त्याच्या नावावर 28 शतकांसह 54.54 च्या सरासरीने 8346 धावा आहेत. असे असले तरी विराटला लवकर बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाज सर्वात माहिर असल्याचे दिसून आले आहे. श्रीलंकन गोलंदाजांनी ब:याचदा त्याची कोंडी केली आहे. पल्लेकल येथील दुस:या वन डे सामन्यात धनंजयने त्याचा अवघ्या 4 धावांवर त्रिफळा उडवला. तर तिस:या सामन्यात फर्नांडोने त्याला फक्त तीन धावांवर परत पाठवले.
आपल्या एकुण 192 वन डे सामन्यात एकेरीच धावा करण्याच्या त्याच्या 49 खेळी आहेत आणि या 49 मध्ये सर्वाधिक 11 वेळा श्रीलंकेच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्याला लवकर परत धाडले आहे. त्याला लवकर परत धाडले आहे. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी 10 वेळा आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सात वेळा त्याला दुहेरी धावात पोहचण्याआधीच बाद केलंय.
आता हाच शोध आपण वन-डेमध्ये त्याच्या अर्धशतकाआधीच म्हणजे 0 ते 49 धावांदरम्यान बाद होण्याचा घेतला तर त्यातही लंकन गोलंदाजांनीच त्याला सर्वाधिक वेळा अर्धशतकाआधीच बाद केल्याचे दिसून येते. वन डे मध्ये विराटच्या 120 सामन्यातल्या 112 खेळी 50 पेक्षा कमी धावांच्या आहेत. यात लंकेच्या गोलंदाजांनी सर्वाधिक 26 वेळा त्याला पन्नाशी गाठण्याआधीच बाद केलेय. त्याखालोखाल इंग्रज गोलंदाज आहेत ज्यांनी 18 वेळा विराटला वन-डे अर्धशतकापासून वंचित ठेवलेय.
एवढेच नाही तर परदेशी खेळताना श्रीलंकेतच विराटच्या अर्धशतकापेक्षा कमी असलेल्या सर्वाधिक 17 खेळी आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियात तो 13 वेळा 50 च्या आधी बाद झालाय. यावरुन हे दिसून येतंय की विराटला लवकर बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाज सर्वात माहिर आहेत.