शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
3
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
4
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
5
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
6
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
7
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
8
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
9
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
10
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
12
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
13
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
14
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
15
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
18
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
19
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
20
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार

एस.टी. कर्मचाऱ्यांनी अंत पाहु नये - अजित पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 1:58 PM

जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत ...

जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत आहे. त्या समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत त्यावर निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांनी आता टोकाची भुमिका घ्यायला लावु नये, आता सहनशिलता संपण्याची वेळ आली असून त्यांनी कामाला सुरूवात करावी,अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकऱ्यांना इशारा दिला आहे.

उपमुख्यंत्री अजित पवार हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, राज्यात एस.टी कर्मचाऱ्यांच्या मानधन आणि वेतनात वाढ करण्यात आली आहे.. मात्र जर नवीन भरती सुरू झाली तर काय होईल, याचा विचार संपकऱ्यांनी करावा. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळी होतील, असा शब्द देखील देण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांनी देखील समंजस भुमिका घ्यावी, असेही पवार म्हणाले.कर्जमाफीवर ते म्हणाले की, नियमीत कर्ज भरणाऱ्यांना आणि दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मात्र कोविडची परिस्थिती निवळल्यावर आणि सरकारची आर्थिकस्थिती पुर्वपदावर आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल.’ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर पवार यांनी सांगितले की, ५४ टक्के वर्गाला वंचित ठेवणे हे योग्य नाही. ३ महिन्यात जनगणना करु. त्यासाठी ओबीसी आयोगाला निधी दिला जाईल. एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका होऊ शकतात. तसेच मागासवर्गिय आयोगाला आवश्यक निधी तातडीने दिला आहे. उर्वरीत पुरवणी मागण्यांसाठी विधी मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे.’शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना महावितरणची फक्त चालु थकबाकी भरायची आहे. त्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील पानमळ्यांच्या नुकसानीबद्दल लवकरच चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.