मुद्रांक कार्यालय सील, लग्न आयोजकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:37 PM2021-04-22T23:37:23+5:302021-04-22T23:37:43+5:30

अमळनेर पोलिसांनी आणि पालिकेने तीन लग्नकार्याच्या यजमानांना दंड करून मुद्रांक विक्रेते कार्यालय  ३० एप्रिलपर्यंत सील केले आहे. 

Stamp office seals, fines wedding organizers | मुद्रांक कार्यालय सील, लग्न आयोजकांना दंड

मुद्रांक कार्यालय सील, लग्न आयोजकांना दंड

Next
ठळक मुद्देमुद्रांक विक्रेते कार्यालय  ३० एप्रिलपर्यंत सील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : कोरोनाचा संसर्ग  मोठ्या प्रमाणात वाढत असून तालुक्यातील मृत्यूचे प्रमाण कमी होत नसतानाही नागरिक ऐकायला तयार नाहीत.  पोलिसांनी आणि पालिकेने तीन लग्नकार्याच्या यजमानांना दंड करून मुद्रांक विक्रेते कार्यालय  ३० एप्रिलपर्यंत सील केले आहे. 

२२  रोजी सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, प्रमोद पाटील, बी.एन. साळुंखे, पालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल, यश लोहरे, सुरेश चव्हाण, जयदीप गजरे, विशाल सपकाळे, अविनाश बिऱ्हाडे, जगदीश बिऱ्हाडे यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या लग्नाच्या ठिकाणी पाहणी केली असता तीन ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमली  असल्याचे आढळून आले. 

तसेच  जेवणाच्या पंगती सुरू होत्या, त्यामुळे कल्पनाबाई साखरलाल महाजन, शैलेश निंबा अमृतकार, भिकन नामदेव पाटील या तीन वेगवेगळ्या आयोजक व यजमानांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

दररोज कारवाई करूनही कमी प्रमाणात दंड होत असल्याने नागरिक, दुकानदार नियमांचा भंग करीत असल्याने गर्दी वाढून संसर्गाने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या वर्तणुकीत सुधारणा करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.

३० एप्रिलपर्यंत कार्यालयाला कुलुप

तहसील कार्यालयामागील मुद्रांक विक्रेते कार्यालयात खरेदी-विक्री नोंदी  करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचे आदेश दिल्यानुसार ते कार्यालय कुलूप सील करण्यात आले.  पुन:पुन्हा हे प्रकार होऊ नयेत म्हणून मुद्रांक विक्रेत्यांनीदेखील संमती दिल्याने ३० एप्रिलपर्यंत या कार्यालयाला कुलूप राहणार आहे.

Web Title: Stamp office seals, fines wedding organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.