येथील प्राचीन जैन दिगंबर मंदिरास तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. समाज मंदिराचा गर्भगृह, गाभारा व कळस समाज वर्गणीतून पूर्ण करण्यात आला आहे. संपूर्ण काम बन्सी पहाडपूर लाल दगडातून केले जात असून, सभामंडपाच्या कामाचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे ५५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी मूलभूत विकास योजनेंतर्गत निधी मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी निवेदन देताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, श्री दिगंबर जैन मंदिर संस्थानचे अध्यक्ष दिनेश जैन, उपाध्यक्ष मंगेश जैन, सचिव महावीर जैन, मधुकर जैन, विजय जैन, दिलीप जैन, महेश जैन, भूषण जैन समस्त पदाधिकारी व विकास धनगर यांचे सहकार्य लाभले. मंदिराच्या सभागृहासाठी निश्चितच कार्य केले जाईल. निधी उपलब्धतेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मकता दर्शवली.