जळगावात लसींचा आता चार दिवसांचाच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:08+5:302021-04-27T04:17:08+5:30
जळगाव : शहरातील गेल्या चार दिवसांपासून ठप्प असलेली लसीकरण केंद्रे सोमवारी सुरू झाली. मात्र, हा चार दिवसांचा साठा आहे. ...
जळगाव : शहरातील गेल्या चार दिवसांपासून ठप्प असलेली लसीकरण केंद्रे सोमवारी सुरू झाली. मात्र, हा चार दिवसांचा साठा आहे. रविवारी सायंकाळी २५ हजार डोस प्राप्त झाले होते. सहा केंद्रांवर जवळपास १ हजारापर्यंत लसीकरण रोज होत आहे. त्यामानाने शहरातील लसीकरण केेंद्रांना लस कमी प्रमाणाात उपलब्ध होत आहे. येत्या दोन दिवसांत २४०० डोस कोव्हॅक्सिनचे येणार आहेत. त्यातील काही प्रमाणात डोस हे शहरातील केंद्रांना मिळणार आहेत.
एका आठवड्यात साधारण तीस हजारांपर्यंत कोविशिल्डचे डोस प्राप्त हाेत आहे. त्या तुलनेत कोव्हॅक्सिनचे कमी डोस येत आहेत. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस केंद्र बंदच ठेवावे लागत आहे. २ लाख २३ हजारांवर नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.