रावेरमधील तीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:38 PM2020-08-13T23:38:27+5:302020-08-13T23:40:03+5:30
सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातानंतर शासनाने महामार्गावरील जीर्ण व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा फतवा काढल्यानंतर तालुक्यातील रावेर ते विवरे दरम्यान असलेल्या नागझिरी नदीवरील, पारशा नाल्यावरील व श्री बिजासनी माता मंदिरासमोरील मात्राण नाल्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्यांच्या पीलरचे मजबुतीकरण व पुलांचे रुंदीकरण करण्यात आल्याची माहिती रावेर व सावदा उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांनी दिली.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातानंतर शासनाने महामार्गावरील जीर्ण व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा फतवा काढल्यानंतर तालुक्यातील रावेर ते विवरे दरम्यान असलेल्या नागझिरी नदीवरील, पारशा नाल्यावरील व श्री बिजासनी माता मंदिरासमोरील मात्राण नाल्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्यांच्या पीलरचे मजबुतीकरण व पुलांचे रुंदीकरण करण्यात आल्याची माहिती रावेर व सावदा उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांनी दिली.
सावित्री नदीवरील पुल कोसळून पडण्याच्या घटनेपूर्वी बºहाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील सावदा शहरातील गुरांच्या बाजारासमोरील पुल कोसळून पडल्याची दुर्घटना घडली होती. त्या अनुषंगाने याच राज्य महामार्गावर वडगाव ते वाघोदा दरम्यान असलेल्या सुकी नदीवरील जुन्या व जीर्ण पुलाच्या पिलर्सच्या पायाखालचा भूस्तर खचून वाहून गेल्याची बाब ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणली होती. तत्संबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेऊन त्या पुलाच्या पिलर्सच्या पायाचे व पिलर्सचेही काँक्रिटीकरणाने मजबूतीकरण केले होते.
सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने जीर्ण व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावदा उपविभागीय क्षेत्रात असलेल्या वडगाव-वाघोदा दरम्यानच्या पुलाचे मजबुतीकरण तत्पूर्वीच झाल्याने एकही जीर्ण व जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची गरज नव्हती.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रावेर उपविभागीय कार्यक्षेत्रात बºहाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील रावेर ते सावदा दरम्यानच्या रावेर शहरालगत असलेल्या नागझिरी नदीवरील पुलाचे, पारशा नाल्यावरील पुलाचे व श्री बिजासनी माता मंदिरासमोरील मात्राण नाल्यावरील पुलांचे आॅडीट करण्यात आले होते. संबंधित पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार शहरातील नागझिरी नदीवरील पुलाचे पिलर्सचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. रावेर-विवरे दरम्यानच्या पारशा नाल्यावरील व श्री बिजासनी माता मंदिरासमोरील मात्राण नाल्यावरील पुलाचे पिलर्सचे व त्यांच्या पायांचे मजबुतीकरण करून तथा या दोन्ही पुलांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.तीनही पुलांच्या मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी अंदाजे ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्ची पडली.
दरम्यान, रावेर ते बºहाणपूर दरम्यान असलेल्या भोकर नदीवरील व कर्जोद नाल्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणे गरजेचे होते. मात्र स्ट्रक्चरल आॅडिट झाले नसले तरी कर्जोद नाल्यावरील पुलाचे मजबुतीकरण करण्यात आल्याची पुष्टीही इम्रान शेख यांनी जोडली आहे.