अपघातातील जखमीवर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:09+5:302021-02-17T04:21:09+5:30
जळगाव : अपघतात जखमी झालेल्या एका तरुणावर यशस्वी उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांना ...
जळगाव : अपघतात जखमी झालेल्या एका तरुणावर यशस्वी उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. या रुग्णाला सोमवारी घरी सोडण्यात आले. या तरुणाच्या पोटाला जबर मार लागल्याने पोटात रक्तस्राव झाला होता.
जळगाव येथील रहिवासी एका ३५ वर्षीय तरुण ३१ जानेवारी रोजी अपघातात जखमी झाला होता. यात त्याच्या पोटाला जबर मार बसल्याने त्याला रात्री शस्त्रक्रिया वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान या तरुणाच्या पोटातील आतील भागात मार लागल्याने अंतर्गत रक्तस्राव झालेला होता. शल्यचिकित्सा विभागप्रुख डॉ. मारोती पोटे यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. संगीता गावित, डॉ. रोजन पाटील यांनी शस्त्रक्रिया केली. या दरम्यान, तरुणाला तीन पिशव्या रक्त लागले. पोटातील जखमी भाग बाहेर काढून तरुणाला जीवदान देण्यास डॉक्टरांना यश आले. काही दिवस तरुणाला रुग्णालयात ठेवल्यानंतर त्याला १५ रोजी घरी सोडण्यात आले.