जळगाव येथील बिल्डर आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:23 PM2018-02-24T22:23:45+5:302018-02-24T22:23:45+5:30
बिल्डर अजय पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात पाटील यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी शनिवारी रामानंद नगर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात अद्याप कोणाविरुध्दही गुन्हा दाखल झालेला नाही. नोट बंदीच्या काळात व्यवसायातील काही लोकांनी नोटा बदलविण्यासाठी अजय पाटील यांना काही रक्कम दिली होती. त्यातील काही जणांना ही रक्कम परत करावयाची राहून गेली होती व त्यासाठी आता त्यांच्याकडून व्याजासह पैशाची मागणी होत असल्याने बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) अजय ओंकार पाटील (वय ५३, मूळ रा. पिळोदा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी आत्महत्या केल्याचा उलगडा झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२४ : बिल्डर अजय पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात पाटील यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी शनिवारी रामानंद नगर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात अद्याप कोणाविरुध्दही गुन्हा दाखल झालेला नाही. नोट बंदीच्या काळात व्यवसायातील काही लोकांनी नोटा बदलविण्यासाठी अजय पाटील यांना काही रक्कम दिली होती. त्यातील काही जणांना ही रक्कम परत करावयाची राहून गेली होती व त्यासाठी आता त्यांच्याकडून व्याजासह पैशाची मागणी होत असल्याने बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) अजय ओंकार पाटील (वय ५३, मूळ रा. पिळोदा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी आत्महत्या केल्याचा उलगडा झाला आहे.
पाटील यांनी आत्महत्या करण्यामागील कारण त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेले होते व ही डायरी गुरुवारी कुटुंबाच्या हाती लागली होती. ही डायरी घेऊन अजय पाटील यांची पत्नी ज्योती, मुलगा परेश, मुलगी ऐश्वर्या व शालक राजेंद्र पाटील आदी जण शनिवारी सायंकाळी रामानंद नगर पोलिसांकडे आले होते. तेथे उपअधीक्षक सचिन सांगळे यांनाही त्यांनी घटनेची माहिती दिली. सांगळे यांनी चौकशी करु, त्यात काय निष्पन्न होते त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या चिठ्ठीत कोणाचेच नाव नाही, परंतु भविष्यात कुटुंबाकडे पैशाचा कोणी तगादा लावू नये असेही पाटील परिवाराने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. एक दोन दिवसात या प्रकरणात ठोस माहिती हाती लागेल असेही सूत्रांनी सांगितले.