एरंडोल येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 09:36 PM2020-02-27T21:36:19+5:302020-02-27T21:37:03+5:30
नापिकी व कर्जामुळे समाधान कर्तारसिंग पाटील या शेतकºयाने आत्महत्या केली.
एरंडोल, जि.जळगाव : नापिकी व कर्जामुळे समाधान कर्तारसिंग पाटील (वय ३५, रा.गांधीपुरा, एरंडोल) या शेतकºयाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी या शेतकºयाचा मृत्यू झाला.
गांधीपुरा भागातील यशोदीप चौकातील समाधान कर्तारसिंग पाटील या शेतकºयाने रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान विषारी द्रव्य प्राशन केले. बुधवारी सायंकाळी जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
त्यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर सोसायटी, बचतगट व खासगी सावकारीचे सात-आठ लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे त्यांनी आपल्या शेतात लावलेल्या ज्वारी पिकाचा तोंडाशी आलेला घास वाया गेला. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या चिंतेने त्रस्त होऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
विशेष म्हणजे त्यांची पत्नी इतर कुटुंबियांसह नंदुरबार येथे नातेवाईकाच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमाला गेलेली होती. तेव्हा समाधान यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, लहान भाऊ असा परिवार आहे.