रेल्वेखाली झोकून देत कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 08:02 PM2019-12-12T20:02:25+5:302019-12-12T20:05:06+5:30

सततची नापिकी आणि त्यामुळे डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यासाºयाला कंटाळून येथील सखाराम दुशाल पवार (वय ६७) या वृद्ध शेतकºयाने १२ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतालगत असलेल्या रेल्वे लाईनवर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.

Suicide of elderly farmer lending to train | रेल्वेखाली झोकून देत कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

रेल्वेखाली झोकून देत कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देअवकाळी पावसामुळे राहते घर कोसळलेनांद्रा येथील घटनेने समाजमन सुन्ननापिकी व कर्जबाजारीपणामुळे होते त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
सामनेर, ता.पाचोरा : सततची नापिकी आणि त्यामुळे डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यासाºयाला कंटाळून येथील सखाराम दुशाल पवार (वय ६७) या वृद्ध शेतकºयाने १२ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतालगत असलेल्या रेल्वे लाईनवर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.
सखाराम पवार यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज होते. या वर्षी झालेल्या अवकाळी पावसात त्यांचे रहाते घरदेखील कोसळले होते. त्याचा पंचनामा होऊनही कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अति पावसामुळे पिके हातून गेली. या विवंचनेत असताना आता जगायचे कसे, म्हणून ते अस्वस्थ होते.
गुरुवारी १२ रोजी सकाळी शेतात जाऊन येतो, असे सांगून ते गेले आणि शेताला लागून असलेल्या रेल्वे रुळावरून येणाºया धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. त्यांचा स्वभाव अंत्यत मनमिळाऊ व प्रामाणिक होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात्त पत्नी, दोन मुले, सुन, नातवंडे असा परीवार आहे. घटनेचा पंचनामा सहाय्यक फौजदार रामदास चौधरी यांनी केला.

Web Title: Suicide of elderly farmer lending to train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.