आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - ईश्वर कॉलनीतील रहिवाशी भावराव गिरधर सोनवणे (वय 75) यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.ही घटना घडली तेव्हा घरातील सर्व जण रात्री घराबाहेर झोपले होते. सकाळी सात वाजता उठल्यानंतर दरवाजा उघडताच घरात भावराव सोनवणे यांनी साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.सोनवणे यांच्या पश्चात मुलगा अरुण, रवींद्र सोनवणे, सून सुरेखा, वंदना, नातू वैभव, चेतन व नात ज्योत्सना असा परिवार आहे.दरम्यान भावराव सोनवणे यांनी आत्महत्या का केली असावी ? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांनाही असून कारण स्पष्ट झालेले नाही.
जळगावात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:00 PM
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - ईश्वर कॉलनीतील रहिवाशी भावराव गिरधर सोनवणे (वय 75) यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.ही घटना घडली तेव्हा घरातील ...
ठळक मुद्देईश्वर कॉलनीतील घटनाआत्महत्येचे कारण अस्पष्ट