संडे स्पेशल मुलाखत_ भाजपकडून खच्चीकरणाचा अनुभव मी स्वत: घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 07:38 PM2020-10-24T19:38:45+5:302020-10-24T19:41:47+5:30

आक्रमक आणि डोईजड होणारे नेतृत्व, कार्यकर्ते भाजपात चालत नाही.

Sunday Special Interview_ | संडे स्पेशल मुलाखत_ भाजपकडून खच्चीकरणाचा अनुभव मी स्वत: घेतला

संडे स्पेशल मुलाखत_ भाजपकडून खच्चीकरणाचा अनुभव मी स्वत: घेतला

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅड. ईश्वर जाधव यांनी व्यक्त केल्या भावनासंडे स्पेशल मुलाखतआक्रमक आणि डोईजड नेतृत्व भाजपात चालत नाही.

चाळीसगाव : आक्रमक आणि डोईजड होणारे नेतृत्व, कार्यकर्ते भाजपात चालत नाही. त्याचे पद्धतशीर खच्चीकरण केले जाते, याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे याच आक्रमकतेचे बळी ठरले आहे. तथापि त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. चाळीसगाव तालुक्याची राजकीय गणितेही बदलतील. राष्ट्रवादीसाठी खडसेंचे पक्षांतर बेरजेचे असेल. मी मात्र काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे मत माजी आमदार ॲड. ईश्वर जाधव यांनी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णशी त्यांनी संवाद साधला. १९९०मध्ये एकनाथराव खडसे यांच्यासोबतच आमदार म्हणून निवडून आलेले ॲड. ईश्वर जाधप यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला.
प्रश्न : एकनाथराव खडसे यांच्यावर भाजप सोडण्याची वेळ का आली?
मुक्ताईनगरात स्वत: खडसे आणि चाळीसगाव तालुक्यात मी. आम्ही दोघांनी भाजपाचे निशाण रोवत परिसर पिंजून काढला. खूप आक्रमकता भाजपात चालत नाही. डोईजड होऊ पाहणाऱ्या नेतृत्वाला घेरले जाते. पक्षासाठी खूप काही करुनही एकनाथराव खडसे यांना आक्रमक कार्यपद्धतीमुळे भाजप सोडावा लागला. मी १९९० मध्ये भाजपतर्फे चाळीसगाव मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलो. माझ्या रुपाने भाजपचे तालुक्यात खाते उघडले. माझीही आक्रमकता अडसर ठरली. मला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले गेले. माजी आमदार अरुण पाटील, डॉ. बी. एस. पाटील यांचीही कथा अशीच आहे. यात एकनाथराव खडसे हे अजून एक नाव वाढले आहे.
प्रश्न : खडसे यांच्या पक्षांतराचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
जाधव : खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. याचा साहजिकच फटका भाजपला बसेल. खडसे आणि भाजपातील कलगीतुराही वाढलेला दिसून येईल. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धक्का देईल. ही राष्ट्रवादीसाठी बेरीज तर भाजपासाठी वजाबाकी असेल. काँग्रेस आणि शिवसेनेलाही संधी मिळेल. एकूणच महाविकास आघाडीला जिल्ह्यात ह्यअच्छे दिनह्णयेतील.
प्रश्न : भाजपाने खडसेंबाबत चूक केली असे म्हणायचे का?
जाधव : हो निश्चितच. पक्षासाठी अपार कष्ट करणा-या कार्यकर्त्याला, नेतृत्वाला नामोहरम करणे त्याच्यासाठी क्लेशदायीच असते. ते एकनाथराव खडसेंबाबत झाले.
प्रश्न: चाळीसगावच्या राजकीय सारीपाटावर काय परिणाम होतील ?
२००९ चा अपवाद वगळता प्रत्येक विधानसभेत भाजपने विजयी गुलाल उधळला. त्याचा पाया १९९० मध्ये माझ्या विजयाने रचला गेला. भाजपचा हा बालेकिल्ला एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने काहीसा ढासळेल.
प्रश्न : तुम्हीही राष्ट्रवादीत जाणार का?
अजिबात नाही. मी काँग्रेसचेच काम करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न नाही. आमची महाविकास आघाडी असल्याने काँग्रेसलाही फायदा होईल.

 

 

Web Title: Sunday Special Interview_

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.