सक्षमीकरण होणे गरजेचे
जळगाव : केवळ कायदेशीर अधिकार व हक्क यांच्याच माध्यमातून नव्हे तर त्यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आपल्या अंतर्मनाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. नितीन मतकरी यांनी केले. महिला दिनानिमित्त केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. के. पी. राणे, प्रज्ञा विखार, प्रा. संजय सुगंधी आदी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
जळगाव : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, राहुल पाटील, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.
शिक्षणशास्त्र विद्यालयात महिला दिन साजरा
जळगाव : ज. जि. म. वि. सह. संस्था संचलित शिक्षणशास्त्र विद्यालयात जागतिक महिला दिन ऑनलाईन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या एस. डी. सोनवणे उपस्थित होत्या. आदर्श अध्यापन शाळेच्या शिक्षिका सुरेखा भदाणे, अनिता भोसले, प्रियंका साळुंखे यांचा यावेळी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. एस. वाय. नन्नवरे, प्रा. व्ही. ए. गायकवाड, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. आर. एल. निळे, प्रा. डॉ. एस. बी. पाटील, विजय पवार उपस्थित होते. छात्राध्यापक साबीर गवळी, शिवप्रिया गवळी, पल्लवी जाधव, वैशाली पाटील, आम्रपाली मोरे, स्वाती पवार, माया पवार, हर्षाली माळी, ममता कोळी, चेतना बडगुजर, गायत्री मोरे, माधुरी सोनवणे, पूनम पाटील, योगिता पाटील, क्रांती देवरे, पूनम कामिलकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार
जळगाव : अलफैज उर्दू हायस्कूलमधील स्काऊट गाईड विभागातर्फे महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम अध्यक्ष मुश्ताक सालार यांची प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शेख नवाब, जाहीद खान, शेख वकार, आयशा खान, मुनव्वर सुलताना, शाहीर कुरेशी, शेख समरीन, जुबेर खान, जमील खान, शेख रिजवान, अजहर खान, खिजर खान, शेख अकीला, शेख कमरून्नीसा आदी उपस्थित होते.