डीआरएमकडून रावेर स्थानकावर पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 03:25 PM2019-12-25T15:25:06+5:302019-12-25T15:26:25+5:30
मध्य रेल्वेच्या रावेर स्थानकाला भुसावळ विभागीय व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौºयाच्या अनुषंगाने रेल्वेस्थानकावर कामांची पाहणी केली.
रावेर, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्यारावेर स्थानकाला भुसावळ विभागीय व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दि.२७ डिसेंबर रोजी होणाºया दौºयाच्या अनुषंगाने रेल्वेस्थानकावर कामांची पाहणी केली. याप्रसंगी भुसावळ विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रवाशांनी यावेळी निवेदन दिले.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मित्तल यांचा भुसावळ विभागाचा दौरा निश्चित झाला आहे. या दौºयात ते रावेर रेल्वेस्थानकाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले. तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ सुरू असलेल्या बांधकामाची तसेच प्रवाशांसाठी उभारण्यात येणाºया दुचाकी व चारचाकी वाहनतळाच्या कार्यस्थळावर बांधकामाची पाहणी केली. स्थानकात उभारण्यात येणाºया प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणाच्या सूचना यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिल्या. तसेच रीले रूम, प्रवासी जिना, पुरुष व स्त्री प्रवाशांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र प्रतीक्षालायाच्या कामाची पाहणी करून तत्काळ पूर्णत्वास आणण्यासाठी त्यांनी अधिकाºयांना दिल्या.
रावेर रेल्वे स्टेशनला झेलम एक्स्प्रेस, पुणे-दानापूर एक्स्प्रेस व ताप्तीगंगा एक्स्प्रेसला पूर्ण आठवड्यात गाड्यांना थांबा मिळावा, भुसावळहून सुटणाºया सुरत व मुंबई पॅसेंजर गाड्या खंडवा वा बºहाणपूर स्थानकावरून सोडाव्यात, भुसावळ-नागपूर पॅसेंजरला रावेर येथे थांबा मिळावा व इटारसी व सुरत तथा मुंबई पॅसेंजरच्या वेळेचे संयोजन करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोरकर, युवराज महाजन, सुभाष अकोले, भास्कर राणे, बापू कासार, शेख रहीम, एकनाथ पाटील आदींनी डीआरएम गुप्ता यांना दिले.