१ मेपासूनच्या लसीकरणासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:10+5:302021-04-27T04:17:10+5:30

जळगाव : येत्या १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत ...

Systems should be vigilant for vaccination from 1st May | १ मेपासूनच्या लसीकरणासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे

१ मेपासूनच्या लसीकरणासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे

googlenewsNext

जळगाव : येत्या १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच कार्यवाही करायची आहे, यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी यंत्रणांना दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणातील अडचणी व उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस आयएमएचे सचिव डॉ. राधेशाम चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यासाठी कोरोना लसीची उपलब्धता, वितरण व केंद्रांची संख्या, लस उपलब्धता होण्यासाठी करावयाचे प्रयत्न, जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड व्यक्तींची संख्या, त्यांचे झालेले लसीकरण, उर्वरित व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी करावयाची जनजागृती, लसीकरण केंद्रावर यंत्रणेला येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या अडचणी, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणासाठी करावयाची नोंदणी आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या.

जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, त्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणी किटची उपलब्धता यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी येत्या २८ एप्रिलपासून जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेच्या पूर्वतयारीचाही आढावा घेण्यात आला. या मोहिमेत नागरिकांचे सर्वेक्षण करताना यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेऊन कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. वेळेत निदान, वेळेत उपचार या तत्त्वानुसार सर्वेक्षणावर भर देण्यात यावा.यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध विषयांवर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करुन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच कमी करण्यात यंत्रणांना यश येईल, असे सांगून नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Web Title: Systems should be vigilant for vaccination from 1st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.