लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शनिपेठ पोलीस ठाण्यात हाजी गफ्फार मलिक यांच्या तिन्ही मुलांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणालाही उपस्थितीचे आवाहन करण्यात आले नव्हते. मात्र, मलिक यांच्या प्रेमापोटी सर्वधर्मीय नागरिक तसेच राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वत:हून अंत्ययात्रेत उपस्थिती दिली. त्या गर्दीस मलिक यांचे कुटुंबीय जबाबदार नसताना सुद्धा एजाज मलिक, नद्दीम मलिक व फैजवा मलिक या त्यांच्या तिन्ही मुलांवर गर्दी जमविल्याच्या कारणावरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे तिघांवर दाखल असलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर प्रतिभा शिंदे, संजय पवार, ॲड. विजय पाटील, विनोद देशमुख, सचिन धांडे, मिलिंद सोनवणे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, मुकुंद सपकाळे, प्रमोद पाटील, मुकेश टेकवाणी, ललित बागुल, दिलीप लालापुरे, रवी देशमुख, मनोज वाणी, योगेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.