शिक्षक आमदारांनी सोळा शाळांना दिले प्रिंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:37+5:302021-06-18T04:12:37+5:30
नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आमदार निधीतून पाचोरा तालुक्यातील दहा, तर भडगाव तालुक्यातील सहा शाळांना सुमारे अठरा ...
नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आमदार निधीतून पाचोरा तालुक्यातील दहा, तर भडगाव तालुक्यातील सहा शाळांना सुमारे अठरा हजार रुपये किमतीचे प्रिंटर उपलब्ध करून दिले आहेत.
येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हे प्रिंटर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले. अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. टी. जोशी होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय भडगावचे मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वाणी यांनी प्रिंटर स्वीकारले. यावेळी आमदार किशोर दराडे यांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापक अरुण पैठणकर, आकाश संजय वाघ, व्ही. आर. धातरट, ओ. व्ही. वन्से उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी. एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, अजय अहिरे उपस्थित होते.
या विद्यालयांना मिळाले प्रिंटर
श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा, जागृती विद्यालय पाचोरा, तावरे कन्या हायस्कूल पाचोरा, सरदार एस. के. पवार हायस्कूल नगरदेवळा, ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर, माध्यमिक विद्यालय खडकदेवळा, नवजीवन विद्यालय पाचोरा, आप्पासाहेब पी. एस. पाटील विद्यालय नांद्रा, डॉ. जे. जे. पंडित विद्यालय लोहारा, रा. जी. भोसले विद्यालय नेरी वडगाव, डॉ. पूनम पवार माध्यमिक विद्यालय भडगाव, लाडकूबाई माध्यमिक विद्यालय भडगाव, सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव, गो. पु. पाटील माध्यमिक विद्यालय कोळगाव, या. द. पाटील माध्यमिक विद्यालय तांदलवाडी, ब. ज. हिरण माध्यमिक विद्यालय कजगाव.