धरणगाव, जि.जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांसाठी प्रलंबित असलेल्या जूनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर शिक्षक आक्रमक झाले असून चार शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली वंचित शिक्षकांनी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढून नागपूर विधानभवनावर धडकली. यावेळी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करीत आसल्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात राज्यासह खान्देशातील वंचित शिक्षक सहभागी झाले होते.एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा १०० टक्के अनुदानित नसल्याने जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केल्याने शिक्षकांच्या असंतोषामुळे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सेवाग्राम वर्धा ते नागपूर १०० किलोमीटर पायी दिंडी आंदोलनाला गांधींच्या सेवाग्राम येथून सुरू करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून कर्मचारी आज वधेर्तील सेवाग्राम येथे हजारोच्या संख्येने जमा होऊन सहभाग नोदविला. या वर्धा ते नागपूर पायी दिंडीत आमदार किशोर दराडे, आमदार दत्तात्रय सावंत, आ.श्रीकांत देशपांडे पदवीधर मतदारसंघाचे आ.सुधीर तांबे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो.अभ्यंकर, कोकण विभागाचे आमदार बाळाराम पाटील सहभागी झाले. त्यांच्या सोबत शिक्षक संघटनेचे कल्याण बर्डे, आनंतराव गर्जे, डॉ.रवींद्र पानसरे, विजय येवले, सचिन नेलवडे, रामचंद्र मोहिते, समाधान घाडगे, मारुती गायकवाड, शंकर वडने, प्रमोद देशमुख, मुकंद मोहिते आदी शाळा कृती समितीचे पदाधिकारी , जळगाव माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील आदी सामील झाले होते.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ही पदयात्रा विधान भवनावर धडकली. यावेळी सरकारतर्फे बाळासाहेब थोरात यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात नाशिक, नगर, धुळे, जळगाव येथील शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे.
जुन्या पेंशनसाठी शिक्षक आमदारांसह शिक्षक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:46 AM
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांसाठी प्रलंबित असलेल्या जूनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर शिक्षक आक्रमक झाले असून चार शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली वंचित शिक्षकांनी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढून नागपूर विधानभवनावर धडकली.
ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनातील पडसादखान्देशातील वंचित शिक्षकांचाही सहभाग