कासोदा : कासोदा येथील पाणी योजनेची चाचणी आठ दिवसात होऊन पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे, असा सज्जड दम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांना भरला आहे.
कासोदा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी सायंकाळी ना.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बिर्ला चौकात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी येथील रेंगाळलेला पाणी प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत, आठ दिवसात रिझल्ट देण्याविषयी आदेश दिले. अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील हे होते.
व्यासपीठावर सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, हिंमतराव पाटील, विष्णू भंगाळे, महानंदा पाटील, रमेश महाजन, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, जगदीश पाटील, किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, विवेक पाटील, बबलू पाटील,महेश पांडे, दिलीप रोकडे, संजय पाटील, अनिल पाटील,गबाजी पाटील, रमेश जमादार, भास्कर चौधरी, संजय नवाल, सुदाम राक्षे, रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी कासोदा पाणी योजनेची टेस्टिंग झाल्यानंतर संपूर्ण गावाच्या प्रत्येक भागात पाणी मिळते की नाही ते कळेल,या पाणी योजनेतून पाणीपुरवठा अपुरा पडत असला तरी चिंता करण्याची गरज नाही, माझ्याकडे पाणीपुरवठा खाते असल्याने गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल, अशी ग्वाही देऊन मतदार संघ बदलला तरी या गावाशी जुळलेली नाळ पक्की असल्याचे सांगत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे नावं घेऊन आठवणी सांगितल्या, तीन विरुद्ध विचारांच्या पक्षाचे असले तरी राज्य सरकारचे काम देशात सर्वोत्तम असल्याचे काही उदाहरणे देऊन पटवून दिले.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव व आपणात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगून अंजनी प्रकल्पाच्या कालव्याबाबत सविस्तर माहिती दिली, सोनबर्डी ह्या गावाचे पुनर्वसन होण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी हर्षल माने व महानंदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महेश पांडे यांनी, सूत्रसंचालन गोकूल शिंपी यांनी तर आभार रवींद्र चौधरी यांनी मानले.
140821\img-20210814-wa0334~2.jpg
कासोदा-येथे गोविंद महाराज प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करतांना ना.गुलाबराव पाटील,सोबत महेश पांडे, हर्षल माने, रविंद्र चौधरी भास्कर चौधरी आ.चिमणराव पाटील हे छायाचित्रात दिसत आहेत.