जागोजागी रस्त्यांवर साचले डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:09 PM2020-08-14T13:09:40+5:302020-08-14T13:09:57+5:30
गैरसोय : वाहनधारकांसह पादचाऱ्यांची कसरत, मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधीचे सपशेल दुर्लक्ष
जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांसह अंतर्गंत रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबले आहे. यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत असून, दुसरीकडे अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्तादेखील शिल्लक राहिला नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे या रस्त्यांवरून मनपाचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांचा वापर सुरू असतानांही त्यांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.
शहरात एकीकडे कचºयाची समस्या वाढत असतांना दुसरीकडे शहरातील रस्त्यांची समस्यादेखील बिकट झाली आहे. जागोजागी असलेल्या खड्डयांमध्ये पाणी तुंबत असल्यामुळे काही ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणाहून वाहन काढतांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने, दुचाकी सारखे वाहन घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिणामी या ठिकाणाहून वाहतूक संथ गतीने सुरू असून, वाहतुकीची कोंडी उद्भवत आहे. अग्रवाल चौक, महेश चौक व पिंप्राळा रेल्वे गेटकडून रिंगरोडकडे जाणाºया रस्त्यावर तर पादचाºयांना पायी चालण्यासाठी देखील रस्ता नसल्याचे दिसून आले.
यामुळे या परिसरातील रहिवाशांकडून मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वाराचा अपघात
दोन दिवसांपूर्वी पावसामुळे सकाळी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. पाण्यामुळे खड्डयांचा अंदाज न आल्याने, एका दुचाकी स्वाराचे वाहन या ठिकाणी घसरले. तसेच अनेकवेळा रिक्षा, कार ही मोठी वाहनेदेखील फसल्याचे प्रकार घडत असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे हा भाग सखल असल्याने, चारही बाजूने पाणी येते. त्यामुळे पावसाळ््यातील चारही महिने या ठिकाणी खड्डे असतात आणि पाणीही असते.
अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरत
शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महामार्गालगत असलेल्या अग्रवाल चौकात मू. जे. महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्यावर भलीमोठी पाण्याची डबकी तुंबली आहेत. आधीच सखल भाग आणि त्यातही जागोजागी खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढतांना अत्यंत तारेवरची कसरत करावी लागत आहे. पााऊस आल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत असून, पाण्याचा निचरा होईपर्यंत या रस्त्यावरून दुचाकीधारकांची वाहतुकच बंद होत असल्याचे येथील एका व्यावसायिकाने सांगितले. विशेष म्हणजे बहुतांश पादचारी नागरिकांचा तर या ठिकाणाहून वापरच बंद झाला असल्याचेही सांगण्यात आले.