शेंदुर्णी ता. जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेबाबत इच्छूक उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू झाली असून नगर पंचायतची थकबाकी भरण्यासाठी सोमवारी गर्दी झाली होती. पहिल्याच दिवशी १ लाख दहा हजारांची वसुली झाली.आचारसंहितेबाबत बैठकशेंदुर्णी येथे नगरपंचायतीच्या कार्यालयात सोमवारी दुपारी चार वाजता नामनिर्देशन पत्र व मार्गदर्शक सूचना व आदर्श आचारसंहितेबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत इच्छुकांसह गावातील राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने राज्य निवडणूक आयोग व आचारसंहिता यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी राहुल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के. शिरसाठ, शशिकांत लोखंडे, प्रदीप धनके, ईश्वर पाटील, श्रीकांत भोसले, संदीप काळे आदी अधिकाºयांनी इच्छुक उमेदवार व राजकीय नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी सागरमल जैन, सुधाकर बारी, श्रीकृष्ण चौधरी, डॉ. विजयानंद कुलकर्णी, विलास आहिरे, अॅड. प्रसन्ना फासे, यशवंत पाटील, सुनील गुजर, विनोद बारी, धिरज जैन, प्रवीण पाटील, सिद्धार्थ पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी अधिकाºयांनी इच्छुक उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेचे स्वतंत्र नवीन खाते उघडण्याच्या सूचनाही केल्या. या प्रसंगी युनियन बँक आणि सेंट्रल बँकेचे मॅनेजर उपस्थित होते . त्यांनी एकाच दिवसात खाते उघडून देऊ अशी माहिती दिली.तर निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी बँकेच्या मॅनेजर यांना सूचना केल्यात की, इच्छुक उमेदवारांनी एक लाखांपेक्षा व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी बँक खात्यातून पाच लाखापेक्षा अधिक आर्थिक देवाण-घेवाण केली तर आम्हाला सूचित करा. तथापि संबंधित उमेदवार याचा दैनंदिन आर्थिक व्यवहार पूवीर्देखील असेल तर हरकत नाही. परंतु फक्त निवडणूक काळातच संशयास्पद आर्थिक व्यवहार दिसल्यास तोदेखील आचारसंहिता भंगाचा एक भाग होऊ शकतो आणि त्यावर कारवाई देखील होऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली.निवडणुकीने केली लाखाची थकबाकी वसुलीनगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर इच्छुकांनी कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली असून पूर्वी ग्रामपंचायतीची थकीत असलेली घरपट्टी, नळपट्टी व इतर शासकीय थकबाकी भरण्यासाठी धावपळ उडाली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी तब्बल एक लाख दहा हजार रुपये थकबाकीचे वसूल झाले. हा वसुलीचा आकडा येत्या सात दिवसात आणखी वाढेल, अशी जाणकारांमध्ये चर्चा आहे.
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:29 AM
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
ठळक मुद्देइच्छुकांची कागदपत्रे जुळवाजुळवीसाठी धावपळनिवडणूक अधिकाºयांनी घेतली आदर्श आचारसंहितेबाबत बैठक