अमळनेर तालुक्यात टंचाई कायम, ५६ गावांना अजूनही टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 08:29 PM2019-07-03T20:29:33+5:302019-07-03T20:30:03+5:30
अमळनेर : पावसाळा सुरू होऊन २० दिवस उलटले. मात्र, तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य अद्यापही कायम असल्याची सद्य:स्थिती आहे. पुरशा पावसाअभावी ...
अमळनेर : पावसाळा सुरू होऊन २० दिवस उलटले. मात्र, तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य अद्यापही कायम असल्याची सद्य:स्थिती आहे. पुरशा पावसाअभावी जूनअखेरदेखील ५४ गावांना ३६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच शहरात १५ दिवसांनी पाणी मिळत असून अग्निशामक दलाच्या बंबांनी पाणी पुरविण्याची कसरत नागरपालिकेला करावी लागत आहे.
अमळनेर तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने भूजल पातळी खालावलेलीच आहे. विहिरी, बोअर आटले आहेत. नैसर्गिक नियमाप्रमाणे जूनअखेरपर्यंत पाऊस पुरेसा पडतो. त्यामुळे शासनातर्फे टँकर बंद केले जातात. मात्र तालुक्यातील ५४ गावांची परिस्थिती आहे तशीच असल्याने टँकर कमी झालेले नाहीत. जानवे, शिरसाळे, डांगरे, पिंपळे खुर्द, निसर्डी, वाघोडा, शिरूड, नगाव बुद्रूक, भोरटेक, धानोरा, मांजर्डी, कचरे, झाडी, इंदापिंप्री, कावपिंप्री, जैतपीर, भरवस, लोणपंचम, आटाळे, पिंपळे बुद्रूक, अनचलवाडी, गलवाडे बुद्रूक , गलवाडे खुर्द, आर्डी, आनोरे, खेडी, खरदे, वासरे, सबगव्हान, खेडी प्रगणे जळोद, पिंपळी प्र.ज., मालपूर, खोकरपाट, मंगरूळ नगाव खुर्द, धुपी, बोरगाव, गोवर्धन, सारबेटे बुद्रूक, फापोरे बुद्रूक, हेडावे, सुंदरपट्टी, मारवड, बिलखेडे, जानवे, फापोरे खर्दु, तळवाडे, मांजर्डी गडखांब, खडके, वाघोदा, ढेकू खुर्द, ढेकू बुद्रूक तांडा, देवगाव देवळी, कोंढावळ, जैतपीर, खेडी व्यवहारदळे, कुर्हे सीम, नांद्री या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जाते. पाणी पातळी प्रमाणाबाहेर खालावली असल्याने तालुक्यात जोरदार पावसाची अपेक्षा आहे.