फोटो
जळगाव : चौगुले प्लॉट परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी केली. पंधरा तोळे दागिने हाती न लागल्याने सुरक्षित राहीले, काहीच मिळत नाही म्हटल्यावर पॅंटच्या खिशातील पैसे व भांडी घेऊन त्यांनी पोबारा केला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लघुलेखक म्हणून नोकरीला असलेले महेश शांताराम पाटील, आई, वडील, पत्नी व मुलीसह चौघुले प्लॉट परिसरातील हनुमानमंदिराजवळ वास्तव्यास आहे. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पाटील कुटुंबियांनी सोबत जेवण केले. त्यानंतर ते रात्री मेनगेटला साखळदंड व कुलूप लावले. त्यानंतर ते वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचे व आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कुलूप शेजारी असलेल्या गटारीत फेकले. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक खेमराज परदेशी हे करीत आहे.
पॅन्टच्या खिशातून लांबविली रोख रक्कम
चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर महेश यांच्या पॅन्टच्या खिशातून ५ हजार त्यांच्या वडिलांच्या पँन्टमधून ३ हजार ५००, कपाटातील त्यांच्या आईच्या पर्समधील ६ हजार तर महेश यांच्या पत्नीच्या पर्समधील २ हजार ५०० अशी १७ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. त्याशिवाय पडदीवर ठेवलेली दोन मोठे पातले, घागर, हंडा, कळशी, ४ छोटे पातेले, ४ पितळी डबे, कढई, दोन गंगाळ असे तांबे व पितळाची भांडी देखील चोरट्यांनी लांबविली. पाटील यांच्या घरातून सुमारे ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. महेश हे पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास उठले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले.