थर्डपार्टी आॅडीटच संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 10:08 PM2018-12-06T22:08:31+5:302018-12-06T22:09:43+5:30

जलयुक्त शिवार योजनेत घोळ

 Thirdparty Audit is in doubt | थर्डपार्टी आॅडीटच संशयाच्या भोवऱ्यात

थर्डपार्टी आॅडीटच संशयाच्या भोवऱ्यात

Next
ठळक मुद्देआॅडीट करणाºया संस्थेकडून न मागताच त्रुटी पूर्ततेचे अहवाल सादर आॅडीट तकलादू

जळगाव: जलयुक्त शिवार योजनेच्या दुसºया टप्प्यातील १३ कामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे ‘ग्रीन होम’ या संस्थेने केलेल्या थर्डपार्टी आॅडीटमध्ये आढळून आल्याने संबंधीत विभाग प्रमुखांना नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला होता. त्याची पडताळणी रोहयोच्या उपअभियंत्यांनी केली असता थर्ड पार्टी आॅडीट करणाºया संस्थेने त्रुटी दूर झालेल्या नसतानाही व संबंधीत विभागांकडून कुठलाही पत्रव्यवहार त्याबाबत झालेला नसतानाही त्रुटी पूर्ततेचे अहवाल दिले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या ‘थर्ड पार्टी आॅडीट’बाबतच संशय निर्माण झाला आहे.
२०१९ पर्यंंत ‘सर्वासाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्टÑ’ ही संकल्पना घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जिल्'ात २०१६-१७ मध्ये दुसरा टप्पा पार पडला. त्यात २२२ कामे २०१८ उजाडल्यावर पूर्ण झाली. या दुसºया टप्प्याचे थर्ड पार्टी आॅडीट एरंडोल येथील ‘ग्रीन होप’ संस्थेतर्फे करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार टप्पा २ मधील कृषी विभागाकडील ३, वनविभागाकडील २, जि.प.कडील २, मृद व जलसंधारण विभागाकडील ६ अशा १३ कामांमध्ये दोष आढळून आल्याचे नमूद करण्यात आले. या टप्पा २ मधील कामांमध्ये दोष आढळून आल्याने जिल्हा प्रशासनातर्फे संबंधीत विभाग प्रमुखांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या विभागप्रमुखांकडून खुलासे सादर झाले. त्या खुलाशांची पडताळणी रोहयोच्या उपअभियंत्यांमार्फत करण्यात येत असून तथ्य आढळल्यास संबंधीत अधिकाºयांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र पडताळीचे काम सुरू होण्यापूर्वीच थर्ड पार्टी आॅडीट करणाºया संस्थेने त्यातील काही कामांच्या त्रुटी दूर करण्यात आल्या असल्याबाबतचा सुधारीत अहवाल सादर केला आहे. प्रत्यक्षात रोहयोच्या अभियंत्यांनी पडताळणी केली असता आधी काढलेल्या त्रुटींची पूर्तता मात्र झालेली नसल्याचे आढळून आले. तसेच संबंधीत संस्थेकडे काम करणाºया विभागाकडून त्रुटींची पूर्तता केल्याबद्दलचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नसतानाही हा त्रुटी पूर्ततेचा अहवाल देण्याचा खटाटोप संबंधीत संस्थेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या ‘थर्ड पार्टी आॅटीड’बाबतच साशंकता व्यक्त होत आहे.
आॅडीट तकलादू
जलयुक्त शिवारच्या दुसºया टप्प्यात ३३० कामे होती. त्यातील ३३ टक्केच कामे थर्डपार्टी आॅडीटसाठी देण्यात आली. मात्र संबंधीत विभागांनी चांगली झालेलीच कामे यासाठी दिली नसतील हे कशावरून? असा मुद्दा उपस्थित होत आहे. तसेच उर्वरीत ६७ टक्के कामे चांगल्याच दर्जाची झाली असतील, हे कशावरून? असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या थर्डपार्टी आॅटीडबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अहवालातील त्रुटी
या थर्ड पार्टी अहवालात वरखेड ता.भडगाव येथील तीन सिमेंट नालाबांधांबाबत एकसारखेच आक्षेप घेण्यात आले. त्यात खोलीकरण केले नाही. भराव करून खोलीकरण न केल्याने पाणीसाठा होऊ शकला नाही, अशा स्वरूपाचे आक्षेप घेण्यात आले. मात्र शेºयामध्ये मात्र दोन बंधाºयांना कामे सूचनात्मक म्हणजेच दुरूस्ती करावी, असा शेरा असून तिसºया बंधाºयाला काम निकृष्ट झाल्याचा शेरा देण्यात आला आहे.
सोनाली ता.जामनेर येथील तीन बांध बांधण्यात आले. त्यात हे बांध बुडीत क्षेत्रात येत असल्याचा येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र तीन महिन्याच्या आतच संस्थेने सुधारीत अहवाल देत त्यात नाल्याची दिशा वळविल्याने आता बुडीत क्षेत्रात येत नाही असे नमूद करण्यात आले. मात्र पडताळणीत मात्र नाल्याची दिशा बदललेलीच नसल्याचे आढळून आले. अन्य एका कामाबाबत पाणी बांधाचे पिचींग केलेले नसल्याचा आक्षेप होता. त्याच्या सुधारीत अहवालात मात्र त्रुटी दूर केल्याचे नमूद होते. प्रत्यक्षात पिचींग केलेलेच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संस्थेने सुधारीत अहवाल देण्याचा खटाटोप कशासाठी व कुणाच्या सांगण्यावरून केला? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title:  Thirdparty Audit is in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.