जळगाव : शहरात कोरोनाचे नवे ३ रुग्ण आढळून आले असून २ रुग्ण बरे झाले आहेत. एकही मृत्यू नसल्याची दिलासादायक स्थिती शहरात कायम आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४३ वर आलेली आहे.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही शंभराच्या आत आली आहे. यात चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ७१ रुग्णांवर उपचार सुरू असून भडगाव तालुक्यात ३ बाधित रुग्णावंर उपचार सुरू आहे. सात तालुक्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण आहेत.
शहरात केवळ कोव्हॅक्सिन
शहरातील कोविशिल्ड लसीचे डोस संपले असून शहरात मंगळवारी चेतनदास मेहता व रोटरी भवन येथे कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे. रोटरी भवन येथे १८ वर्षांवरील सर्व वयोगटासाठी दोनही डोस उपलब्ध राहणार आहेत. तर चेतनदास येथे १८ वर्षांवरील सर्व वयोगटासाठी केवळ दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यात ५० टक्के ऑनलाइन तर ५० टक्के ऑफलाईन सुविधा असणार आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी लस येणार असून बुधवारी ती केंद्रांवर उपलब्ध राहणार असल्याची माहिती आहे.