जळगाव : शनी पेठेतील किशोर चौधरी खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयात दिलेल्या निकालाच्या विरोधात फिर्यादीने दोन तर सरकारपक्षाने एक अशा तीन याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या आहेत.१० मार्च २०१६ रोजी किशोर मोतीलाल चौधरी यांचा खून झाला होता. जिल्हा न्यायालयाने सुरेश दत्तात्रय सोनवणे याला जन्मठेप, रत्नाबाई सुरेश सोनवणे, उमेश धनराज कांडेलकर व वैशाली उमेश कांडेलकर या तिघांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.इतर १० संशयितांना निर्दाेष मुक्त केले आहे. या निकालाच्या विरुद्ध फिर्यादी मोतीलाल भावलाल चौधरी यांनी खंडपीठात दोन याचिका व जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी अपील केले आहे. यात मुख्य आरोपी सुरेश सोनवणे यास फाशी, रत्नाबाई, उमेश व वैशाली यांना व इतरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
किशोर चौधरी खून प्रकरण खंडपीठात तीन याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:47 PM