भुसावळ : शहरातील अतिक्रमणाने डोकेच नाही तर संपूर्ण शरीर वर काढले होते. राजकीय मंडळींच्या अतिक्रमणावर हातोडा चालणार की फक्त नियम सर्वसामान्यसाठीच आहे? नागरिकांमध्ये असे संभ्रम असताना मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी धाडसी कारवाई करत अतिक्रमण केलेल्या बाजारातील जागेसह सुमारे ५० लाख किमतीची असलेली व नुकतेच बांधकाम पूर्ण झालेले तीन दुकाने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे राजकीय गोटांमध्ये खळबळ उडाली आहे.शहरात यावल रोड असो, जामनेर रोड असो जळगाव रोड असो की मुख्य बाजारपेठ प्रत्येक भागामध्ये जणूकाही मालकीच्या जागेपेक्षा अतिक्रमणामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांची कोंडी होऊन श्वास कोंडला गेला आहे. यातच काही राजकीय मंडळी पदाचा गैरउपयोग करून अतिक्रमण करीत आहेत. याबाबत सातत्याने तक्रारी होत्या, अतिक्रमणाबाबत फक्त हातगाडी, लोटगाडी टपरीधारकांवर कारवाईचा बडगा उघडण्यात येत होता. यातून अतिक्रमण फक्त सर्वसामान्यांसाठी तर नियम नाही ना असा संदेश सामान्य नागरिकांमध्ये जात होता, मात्र आजच्या झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण शहरांमध्ये अतिक्रमित केलेल्या मंडळींमध्ये घबराट पसरली आहे.राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने मरीमाता मंदिरासमोर दोन अनधिकृत दुकानाचे बांधकाम करण्यात आले होते. शिवाय ही दुकाने या दुकानाचे काम स्लॅप लेव्हलपर्यंत आल्यानंतर जागेसह ५० लाखाच्या किमती व्यवहाराची चर्चा असताना या बेकायदा बांधकामाची तक्रार करण्यात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात व पालिकेच्या पाच पथकाच्या उपस्थित मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी हातोडा मारून जेसीबीला दुकान तोडण्याचा इशारा दिला. या कारवाईमुळे ज्यांनीही अतिक्रमण केलेले आहे त्यांच्या तंबूत घबराट पसरली आहे.अग्निबंब, रुग्णवाहिका जाण्यासही जागा नाहीशहरात अतिक्रमण इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे की एखादी दुर्दैवी घटना घडल्यास बाजारपेठेत आग विझविण्यासाठी अग्नि बंबाची गाडी किंवा रूग्णाला अत्यावश्यक उपचारार्थ हलविण्यासाठी ॲम्बुलन्ससुद्धा या गल्लीतून जाऊ शकत नाही.
भुसावळात अतिक्रमणात बांधण्यात आलेली तीन दुकाने केली उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:47 PM
भुसावळ : शहरातील अतिक्रमणाने डोकेच नाही तर संपूर्ण शरीर वर काढले होते. राजकीय मंडळींच्या अतिक्रमणावर हातोडा चालणार की फक्त ...
ठळक मुद्देअतिक्रमण हटाव मोहीम सुरूराजकीय गोटात खळबळ