जळगावात तीन हजार भाविकांनी केले अथर्वशीर्ष पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:59 PM2017-08-27T12:59:56+5:302017-08-27T13:05:01+5:30
प्रतिसाद : भाग्यवंतांना चांदीचे शिक्के
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - राष्ट्र समृध्दीसह जिल्ह्यात सर्वत्र शांतता रहावी व एकोपा नांदावा, कोणतेही विघA येवू नये, हा संकल्प घेवून सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक पतसंस्था व स्वामी समर्थ केंद्रातर्फे रविवारी सकाळी जळगावातील सुभाष चौकात अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला़ सकाळी 9 ते 11 या वेळेत महिला, पुरुष तसेच तरुण अशा एकूण तीन हजार भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केल़े ओंकार ध्वनी, शंखनाद, भाविकांच्या सामूहिक आवर्तनाच्या नादाने सुभाष चौक परिसर भावमय झाला होता़
भव्य मंडपात भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली़ मंडपात प्रवेश करताच भाविकांना भारतीय संस्कृतीप्रमाणे टिळा लावून अथर्वशीर्षचे पुस्तक देण्यात आले. महेशकुमार त्रिपाठी यांनी पौरोहित्य केल़े स्वामी समर्थ केंद्राचे भाऊसाहेब शिंपी यांची प्रमुख उपस्थिती होती़ गणेशपूजन करून ओंकारध्वनी व शंखनाद शांतीपाठाव्दारे अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात झाली़ तीन हजार भाविकांच्या सामूहिकरित्या अथर्वशीर्ष पठणाने वातावरणात चैतन्य पसरले होत़े गणपती आरती तसेच राष्ट्रगीताने अथर्वशीर्ष पठणाचा समारोप झाला़ यानंतर कार्यक्रमात सहभागी भाविकांपैकी ‘लकी ड्रॉ’ काढून 51 भाग्यवंतांना 51 चांदीचे शिक्के देण्यात आल़े वाहतुकीचा खोळंबा होवू नये म्हणून मंडळातर्फे दाणा बाजार, बोहरा बाजार, तिजोरी गल्ली, सराफ बाजार या ठिकाणी स्वतंत्र पार्किगची व्यवस्था करण्यात आली होती़