पारोळा, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दि.२ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. एका मागोमाग येणाऱ्या वाहनांचे ब्रेक न लागल्याने ही घटना घडली.याबाबत वाहतूक नियंत्रण कक्ष विभागाचे दीपक आहिरे यांनी सांगितले की, धुळे रस्त्यावर दळवेल गावाजवळ दुपारी एक वाजता धुळ्याकडे जाणारी एक बस भरधाव वेगाने जात होती. तेव्हा गतिरोधक पाहून बसचालकाने ब्रेक मारला. यादरम्यान मागून येणारी मिनी ट्रॅव्हल्स (क्रमांक एमएच-१९-सीएल-१९३३) व त्या पाठी मागून येणारी कार (क्रमांक एमएच-०१-५२३४) या एकमेकावर आदळल्या. त्यात कोणीही जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.यावेळी दीपक गिरासे, रोहिदास पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पारोळा येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:44 PM
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दि.२ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.
ठळक मुद्देपारोळा शहरातील धुळे रस्त्यावरील घटनाब्रेक न लागल्याने घडली घटना