जप्त केलेल्या वाळूच्या तीन वाहनांची अमळनेर तहसीलमधून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:28 AM2020-01-02T00:28:00+5:302020-01-02T00:28:54+5:30

चोरटी वाळू वाहतूक करताना तहसीलदारांनी पकडलेली व जप्त केलेली साडेचार लाखांची तीन वाहने दोघांनी तहसील आवारातून चोरून नेल्याची घटना २९ रोजी रात्री घडली.

Three vehicles of confiscated sand were stolen from Amalner Tehsil | जप्त केलेल्या वाळूच्या तीन वाहनांची अमळनेर तहसीलमधून चोरी

जप्त केलेल्या वाळूच्या तीन वाहनांची अमळनेर तहसीलमधून चोरी

Next
ठळक मुद्देदोघांविरुद्ध पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हासाडेचार लाखांची होती वाहने

अमळनेर, जि.जळगाव : चोरटी वाळू वाहतूक करताना तहसीलदारांनी पकडलेली व जप्त केलेली साडेचार लाखांची तीन वाहने दोघांनी तहसील आवारातून चोरून नेल्याची घटना २९ रोजी रात्री घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ व त्यांच्या पथकाने चोरटी वाळू वाहतूक करताना रुबजी नगर येथील अकबरखा युसूफखा पठाण याचे टेम्पो क्रमांक एमएच ०२-वायए-८९६१, एमएच-०२-एक्सए-८६०१ व हिंगोणे खुर्द येथील भैया शांताराम पाटील यांचे एमएच-०२- वायए-८७६१ ही वाहने वाळूसह जप्त केली होती. २९ रोजी रात्री अकबरखा पठाण व भैया पाटील यांनी तहसील आवारातून सुमारे चार लाख ५६ हजार रुपये किमतीची तिन्ही वाहने तहसील आवारातून चोरून नेली.
३० रोजी सकाळी लिपीक संदीप पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ, तलाठी आशिष पारधी व प्रवीण सोनवणे यांच्याशी चर्चा करून सीसीटीव्ही तपासले असता दोघांनी ही वाहने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाल्याने संदीप पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संजय नारायण पाटील करीत आहेत.
 

Web Title: Three vehicles of confiscated sand were stolen from Amalner Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.