वीजतारांचा शॉक लागून तीन वन्य प्राण्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 08:30 PM2019-07-03T20:30:48+5:302019-07-03T20:30:53+5:30

  बिडगाव, ता.चोपडा : तालुक्यातील मोहरद गावालगत चांदण्यातलाव येथील एका शेतात तुटलेल्या वीजतारांचा स्पर्श होऊन दोन कोल्हे व कुत्रा ...

 Three wild animals die with electricity shock | वीजतारांचा शॉक लागून तीन वन्य प्राण्यांचा मृत्यू

वीजतारांचा शॉक लागून तीन वन्य प्राण्यांचा मृत्यू

Next

 


बिडगाव, ता.चोपडा : तालुक्यातील मोहरद गावालगत चांदण्यातलाव येथील एका शेतात तुटलेल्या वीजतारांचा स्पर्श होऊन दोन कोल्हे व कुत्रा दगावला. दोन दिवसांपासुन तुटलेल्या तारा न जोडल्यामुळे सदर घटना घडली आहे. यामुळे धानोरा वीजवितरण कार्यालयाचा गलथान कारभार समोर आला आहे.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले चांदण्या तलाव रस्त्यावरील रुबाब उस्मान तडवी यांच्या शेतात विजेच्या तारा वादळाने तुटल्या होत्या. यात दोन ते तीन वर्षे वयाचे नर व मादी असे दोन कोल्हे ठार झाले. दरम्यान, कुत्रा भुंकत मृत कोल्ह्यांकडे गेला असता तारांचा स्पर्श होऊन तोही दगावला.
वादळामुळे दोन दिवसांपासून वीजतारा तुटलेल्या होत्या. मात्र धानोरा येथील महावितरण कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे परिसरातील नागरिकांचे मत आहे.
यावेळी वनविभागाचे कर्मचारी व पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रशांत बर्गे व डॉ. तेजभूषण चौधरी यांनी प्राण्यांचे शवविच्छेदन केले.

महावितरण बेजबाबदार
धानोरा येथील वीज महावितरण कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क होत नाही. मोबाईल क्रमांकही लागत नाही. अधिकारी, कर्मचारी अशा घटनांकडेही दुर्लक्ष करतात. त्यांच्या अशा बेजबाबदारपणाच्या वागणुकीमुळे वन्य प्राण्यांचे जीव जात आहेत. याबाबत वरिष्ठांनी दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Web Title:  Three wild animals die with electricity shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.