धरणगाव, जि.जळगाव : येथील धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटीने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचा त्रिवेणी सोहळा उत्साहाने पार पडला.या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी व मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डी.आर पाटील होते.प्रास्ताविक मुख्याध्यापक शेख शकीलुद्दीन जमीलोद्दीन यांनी केले.लिटिल ब्लॉझम स्कूलच्या पुरस्कार प्राप्त शिक्षिका बतुलबी युसूफ साकी यांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आले.व्याख्यानाने उपस्थित भारावलेत्रिवेणी समारंभात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.सलीमभाई पटेल ‘एक उत्तुंग व्यक्तिमत्व व कुशल प्रशासक’ या विषयावर काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पी.आर.चे मुख्याध्यापक प्रा. बी. एन. चौधरी या वक्तव्यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांच्या कार्याचे महत्व व्यक्त केले. सलीम पटेल यांच्याबद्दल भावनिक मत व्यक्त केल्याने उपस्थित भारावले होते.संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी पदार्पणाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ सचिव अब्दुल रहीम खान व संस्थापक ज्येष्ठ सदस्य तथा शालेय समिती चेअरमन हाजी एहसान हुसेन साकी यांचाही मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात अला.प्रमुख अतिथी म्हणून हाजी अब्दुल गफ्फार मलिक, डॉ.अब्दुल करीम सालार, अॅड.अकील इस्माईल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, मुश्ताक सेठ बोहरी, सचिव सी.के.पाटील, सर्व नगरसेवक, जहीरोद्दीन सेठ, जाकिर सय्यद , गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक तसेच संस्थेचे अध्यक्ष- हाजी शफी अहमद भाईमियाँ काझी, सेक्रेटरी अब्दुल रहीम खान युसूफ खान, चेअरमन हाजी एहसान हुसेन सुलतान अली साकी व कार्यकारी सभासद एजाज अहमद खान अब्दुल रहीम खान, अकील अहमद अब्दुल रज्जाक काझी, अलीम अहमद हाजी अब्दुल्लाह शिरपूरकर, युसुफभाई हाजी एहसान हुसेन साकी गुलाम ख्वाँजा हाजी मो. इस्हाक मोमीन, अकबरखान करीमखान, मोहम्मद साबिर मोहम्मद सादिक, मोहम्मद उमर मोहम्मद हातम, तौसिफ सलीम पटेल तसेच शिक्षक व विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन वसीम पठाण व मोहसीन शाह यांनी, तर आभार अकीलखान यांनी मानले.
धरणगावच्या उर्दू एज्युकेशन संस्थेचा सुवर्ण महोत्सवी त्रिवेणी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 8:00 PM
अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचा त्रिवेणी सोहळा उत्साहाने पार पडला.
ठळक मुद्देव्याख्यानाने उपस्थित भारावलेसंस्थेतर्फे विशेष सत्कार