पंचवीस दिवसात ॲक्टीव्ह केसेस पंचवीशे वरून दहा हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:16 AM2021-03-26T04:16:43+5:302021-03-26T04:16:43+5:30
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात अत्यंत चिंताजन वाढ मार्च महिन्याच्या २५ दिवसात नोंदविण्यात आली आहे. यात ॲक्टीव्ह केसेसची संख्या ...
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात अत्यंत चिंताजन वाढ मार्च महिन्याच्या २५ दिवसात नोंदविण्यात आली आहे. यात ॲक्टीव्ह केसेसची संख्या २५०० वरून थेट १० हजारांवर पोहोचली आहे. यात यंत्रणेत बेड शिल्ल्क नसल्याचे अत्यंत भीतीदायक चित्र या आठ दिवसांपासून समोर येत आहेत. मार्चमध्ये जिल्ह्यात तब्ब्ल १९ हजारांवर नवे रुग्ण समोर आले आहेत.
जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. यात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये अत्यंत झपाट्याने हा संसर्ग वाढला आहे. या पंचवीस दिवसांच्या कालावधीत तब्बल १९ हजार ९०८ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार तीन दिवसांपासून तर थेट १ हजार व त्यापेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. पंचवीस दिवसांचा विचार केल्यास ७९६ रुग्ण सरासरी रोज आढळून येत आहेत. यात जळगाव शहर व चोपडा तालुक्यात अधिक चिंताजनक परिस्थिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यात सरासरी सहा हजारांवर तपासण्या होत आहेत. त्यात अधिक रुग्ण समोर येत आहे. बाधितांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
यंत्रणेवर ताण
बरे होणाऱ्यांची संख्या कमी आणि नवे रुग्ण अधिक असे चित्र असल्याने ॲक्टीव केसेसमध्ये वाढ झाली आहे. यात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही २४४८ वर पोहोचल्याने शासकीय यंत्रणेत बेडचा विषय गंभीर झाला आहे. जी काही रुग्णालये आहेत. त्या रुग्णालयांमध्ये कागदांवर बेड खाली दिसतात मात्र, प्रत्यक्षात बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी व तसे वास्तव समोर येत आहेत.
मार्चमध्ये परिस्थिती गंभीर
रुग्ण : ८०७८६, १९९०८ रुग्ण मार्चमध्ये वाढले
ॲक्टीव्ह केसेस : १० हजार २७९, ७ हजार ७७४ ने वाढ
मृत्यू : १५२६ , १४१ ने मृत्यू वाढले
बरे झालेले : ६८९८१ ११९७३ रूग्ण मार्चमध्ये बरे झालेत
हे पाच तालुके चिंताजनक
जळगाव : ३३७१
चोपडा : १६९०
भुसावळ : ९०६
जामनेर : ६१८
धरणगाव : ५९३
चोपड्यात परिस्थिती अनियंत्रीत
जळगाव शहरासह चोपड्यात परिस्थिती अनियंत्रीत असल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी चोपड्यात ३३१ रुग्ण आढळनू आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चोपड्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. या ठिकाणी संसर्ग अत्यंत झपाट्याने होत असल्याचे गंभीर चित्र आहे. या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या १६९० वर पोहोचली आहे.