बीएचआर प्रकरणात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:18 AM2021-02-24T04:18:21+5:302021-02-24T04:18:21+5:30

याबाबतची माहिती उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यात सूरज सुनील झंवर (रा. जय नगर) यालाही अटक करण्यात ...

Two and a half thousand page indictment in BHR case | बीएचआर प्रकरणात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र

बीएचआर प्रकरणात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र

Next

याबाबतची माहिती उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यात सूरज सुनील झंवर (रा. जय नगर) यालाही अटक करण्यात आलेली आहे, परंतु या दोषारोपपत्रात त्याच्या नावाचा उल्लेख नाही. तपासाधिकारी सुचेता खोकले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. बीएचआरमधील आरोपींनी पुण्यातील चार व जळगावातील एक अशा ५ मालमत्ता कवडीमोल किमतीला विकून ठेवीदारांचे तब्बल ४८ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान केले. अटकेतील पाच आरोपींनी आतापर्यंतच्या तपासात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १८३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान, या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार सुनील झंवर व अवसायक जितेंद्र कंडारे यांना अद्यापही अटक झालेली नाही. त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यातच पुण्याच्या पथकाने सुनील झंवर व कंडारे यांच्याबाबतच्या नोटिसा न्यायालय, त्यांचे घर व पोलीस ठाण्यात चिटकवल्या होत्या.

Web Title: Two and a half thousand page indictment in BHR case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.