पाचोऱ्याजवळ हिवरा नदीच्या केटीवेअरमध्ये बुडाले दोन बालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:54 PM2020-07-11T22:54:09+5:302020-07-11T22:55:44+5:30
हिवरा नदी पात्रातील केटीवेअरमध्ये पोहायला गेलेले दोन बालक बुडाल्याची दुर्घटना शनिवारी घडली.
पाचोरा, जि.जळगाव : शहरालगत असलेल्या हिवरा नदी पात्रातील केटीवेअर मध्ये पोहायला गेलेले दोन बालक बुडाल्याची दुर्घटना शनिवारी घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसºयाचा बराच वेळ शोध घेऊनही तो सापडलेला नाही.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा शहरालगत जारगाव हद्दीतील आयटीआय जवळील हिवरा नदीवर केटी वेअर आहे. यामध्ये दुपारी ३ च्या सुमारास जारगाव हद्दीतील नुरानीनगर भागात रहाणारे जुनेद अनिस बागवान (१३) व शाहिद अफजल मन्सुरी (१४) हे पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.
बराचवेळ झाला तरी घरी मुले अली नाही हे पाहून शोधाशोध केली असता जुनेदचा मृददेह पाण्यावर दिसला. मात्र बंधाºयात बराच शोध घेऊनही शाहीदचा तपास लागला नाही. मयत जुनेद हा आई- वडिलांना एकुलताएक मुलगा होता. दोघांचे वडील मजुरी करणारे असून कौंटुबिक स्थिती गरीबीची आहे. दरम्यान पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जुनेदचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.