एरंडोल येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 03:42 PM2020-02-09T15:42:33+5:302020-02-09T15:43:52+5:30

औदुंबर साहित्यिक रसिक मंचतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे

A two-day state-level literary conference at Erandol | एरंडोल येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन

एरंडोल येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन

googlenewsNext
ठळक मुद्दे२८ व २९ मार्च रोजी भरणार साहित्य संमेलनयापूर्वी २००४ मध्ये मिळाला होता साहित्य संमेलन भरविण्याचा मानऔदुंबर साहित्य रसिक मंचतर्फे पत्रकार परिषदेत माहिती

एरंडोल, जि.जळगाव : येथील औदुंबर साहित्यिक रसिक मंचतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन २८ व २९ मार्च २०२० रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष अ‍ॅड.मोहन बी.शुक्ला व सचिव अ‍ॅड.विलास मोरे यांनी ९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक विश्वास पाटील असतील. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांची, तर कार्याध्यक्षपदी प्रवीण महाजन यांची निवड करण्यात आली आहे, अशी अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
विशेष हे की राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरविण्याचे यजमान पद एरंडोल नगरीला यापूर्वी २००४ मध्ये प्राप्त झाले होते. आता दुसऱ्यांदा साहित्य संमेलन भरविण्याचा मान एरंडोल नगरीला मिळणार आहे.
पत्रकार परिषदेस संमेलनाचे स्वागताध्यक्ष अमित पाटील, औदुंबरचे उपाध्यक्ष अरुण माळी, सचिव अ‍ॅड.विलास मोरे, कार्याध्यक्ष प्रवीण महाजन, सहसचिव किशोर पाटील कुंझरकर, सल्लागार जावेद मुजावर आदी उपस्थित होते.

Web Title: A two-day state-level literary conference at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.