सायगाव येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:09 AM2018-11-13T01:09:29+5:302018-11-13T01:11:38+5:30

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरफोड्या करीत दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

 Two house buffaloes at Segaon one night | सायगाव येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

सायगाव येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

Next
ठळक मुद्देएक संशयीत ताब्यातदोन महिन्यात तीन घरफोड्या झाल्याने घबराट

सायगाव ता. चाळीसगाव : सायगाव येथे रविवारी मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी घरफोडी होऊन चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी श्वानपथकाला पाचारण केले होते. तर संशयावरून एकास ताब्यात घेतले आहे.
पहिल्या चोरीचा तपास लागत नाही तोच...
सायगांव येथे २ महिन्यापूर्वी विठाबाई दगा साबळे यांच्या घरी चोरी होऊन सुमारे अडीच लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने मिळून सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला होता. त्या चोरीचा तपास अजुनही लागला नसताना आणि पोलिस चोरट्यांच्या शोधात फिरत असतांनाच रविवारी मध्यरात्री नंतर अर्थात सोमवारी पहाटे एक ते दिड वाजेदरम्यान दीपक मधुकर वेळे यांच्या घरी पोलिसांनी डल्ला मारला. वेळे हे आपल्या बाहेरगावी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी गेले असतांना त्यांच्या मागे चोरटयांनी रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने असे मिळून अंदाजे १ लाख २५००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
एवढेच नव्हे तर त्यांच्या शेजारी राहत असलेले इसेखाँ महमद खाँ पठाण यांच्या घरीही त्यांनी हात साफ केला. पठाण हे झोपेत असतांना त्यांच्या डोक्याजवळ ठेवलेल्या पँटमधून साडेतीन हजार व शेजारी असलेली पेटी उचलून नेली. आणि त्यामधील पाच हजार रुपये रोख काढुन ती पेटी छाजेडनगरमध्ये फेकून पोबारा केला. एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्यामुळे सायगांव येथे भीतीचे वातावरण पसरले आहे .
श्वानपथक, ठसेतज्ञ रिकाम्या हाताने परतले
सायगांव येथे झालेल्या घरफोड्यांची माहिती मिळताच मेहुणबारे येथील एपीआय जयपाल हिरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, जळगाव येथून हस्त ठसेतज्ञांना आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तथापि चोरट्यांचा काहीही माग लागू शकला नाही. ज्या ठिकाणी चोरांनी चोरी केली त्या ठिकाणी त्यांना चार्र्जींगची बॅटरी सापडली त्यामुळे काही धागेदोरे हाती लागतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, सायगांव येथील मोलमजुरी करणारा वाल्मिक बारकू पाटील याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे .

 

Web Title:  Two house buffaloes at Segaon one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.