पासर्डीनजीक अपघातात दोन जखमी, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 03:07 PM2020-11-24T15:07:22+5:302020-11-24T15:18:54+5:30
पासर्डी गावाजवळ दि. २४ च्या पहाटे वळणावर पहुर (जामनेर) येथील मयुर ललित लोढा यांची गाडी नाल्यात गेल्याने यात मयुर लोढा (२७) व त्यांची पत्नी प्रियंका लोढा (२५) हे दोघजण जखमी झाले.
Next
ठळक मुद्देमंगळवारी पहाटेची घटना.गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईला हलवले.
ल कमत न्युज नेटवर्क कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पासर्डी गावाजवळ दि. २४ च्या पहाटे वळणावर पहुर (जामनेर) येथील मयुर ललित लोढा यांची गाडी नाल्यात गेल्याने यात मयुर लोढा (२७) व त्यांची पत्नी प्रियंका लोढा (२५) हे दोघजण जखमी झाले. जखमींना पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रियंका यांच्या मेंदूला मार बसल्याने पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अपघातग्रस्त चारचाकी गाडी क्रेन मागवून बाहेर काढण्यात आली. जळगाव-चांदवड या मार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र वळणावरील काम जमीन अधिग्रहितसाठी थांबली आहेत. वळणावर थांबलेले काम अपघातास आमंत्रण देत आहे. पासर्डीच्या या वळणावर आतापर्यंत दहा ते पंधरा अपघात घडले आहेत. धिम्या गतीने सुरू असलेल्या जमीन अधिग्रहित फाईलच्या प्रवासामुळे या मार्गावरील कामे खोळंबली आहेत. थांबलेल्या प्रत्येक ठिकाणी अपघात नित्याचे झाले आहेत. या फाईलीच्या प्रवासाकडे खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन थांबलेल्या फाईलला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.