मुक्ताईनगरात महामार्गावर आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 03:06 PM2019-12-25T15:06:22+5:302019-12-25T15:08:02+5:30

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Two more victims on the highway in Muktinagar | मुक्ताईनगरात महामार्गावर आणखी दोन बळी

मुक्ताईनगरात महामार्गावर आणखी दोन बळी

Next
ठळक मुद्देचौपदरीकरण कामावरील दोन तरुण सुरक्षारक्षकांना चिरडलेरात्री झोपलेले असताना वाहन गेले डोक्यावरूनडोक्याचा झाला अक्षरश: चेंदामेंदामयत दोघे चुलत आत्येभाऊ होतेघटनास्थळाजवळच असलेल्या या तरुणांच्या मोटारसायकलचेही नुकसानसकाळी घटना उघडकीस आली तेव्हा घटनास्थळी झाली प्रचंड गर्दी

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावर खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेत
कंपनीने सुरक्षा व्यवस्थेकडे डोळेझाक केल्याने तरुणांना जीव गमवावे लागल्याचा आक्षेप घेत नातेवाईकांनी अज्ञात वाहचालकासह चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. दोघा युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जोपर्यंत संबंधी कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे, तर दोन तरुणांच्या अपघाती निधनाने शहर हळहळले आहे.
पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेत तर दोघे चुलत आत्ये भाऊ आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून ते ब्ल्यू स्टार सेक्युरिटीपूर्वी मॅनेजमेंट या कंपनीत सुरक्षगार्ड म्हणून काम करीत होते. मंगळवारी त्यांची रात्रीची ड्युटी चौपदरीकरण महामार्गावर पॉईंट क्रमांक ७० येथे डिव्हायडर मशीन येथे होती. ते झोपले असताना मध्यरात्री ते पहाटे दरम्यान अज्ञात वाहन दोघ तरुणांच्या डोक्यावर वरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा व चेहºयाचा अक्षरश: चेंदामेंदा केला आणि ते जागीच गतप्राण झाले होते. जवळच उभ्या असलेल्या या तरुणांच्या मोटरसायकलचेही नुकसान झाले. सकाळी घटना उघडकीस आल्याने घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.
कंपनीच्या वाहनाने चिरडल्याचा संशय
दरम्यान, ही घटना खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. याठिकाणी कोणतेही वळण रस्त्याचे फलक नव्हते. तसेच या ठिकाणी रस्त्याचे काम करणाºया वाहनांची रात्री वर्दळ असते. त्यामुळे कंपनीच्याच डंपरने हा अपघात घडला असावा, असा संशय मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. कंपनीच्या अज्ञात वाहनासह अज्ञात चालक आणि कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही
तरुणांची ड्युटी असलेल्या ठिकाणी सुरक्षा फलक लावणे गरजेचे आहे. मात्र तसे झाले नाही. घटनास्थळाकडे वाहतूक करणारी वाहने जाण्याचा अधिकतर संबंध येत नाही. या भागात फक्त रस्त्यावर काम करणारी अवजड वाहने रहदारी करतात. त्यामुळे कंपनीच्या वाहनांवर संशय आहे. जोपर्यंत संबंधित कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत तरुणांचे शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकानी घेतली असून, उपजिल्हा रुग्णालयात नातवाईकांचा जमाव थांबून आहे.

Web Title: Two more victims on the highway in Muktinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.