शेतकºयांचा सातबारा कोरा होईपर्यंत लढा सुरुच ठेवणार - उध्दव ठाकरे
By admin | Published: July 12, 2017 1:11 PM
उध्दव ठाकरे यांनी आज पाळधी (जळगाव) येथे शेतकºयांशी संवाद साधताना सांगितले.
आॅनलाईन लोकमत जळगाव, दि. १२ - राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्याप शेतकºयांना लाभ मिळालेला नाही. जोपर्यंत लाभ मिळत नाही व शेतकºयांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पाळधी (जळगाव) येथे शेतकºयांशी संवाद साधताना सांगितले.ठाकरे हे आज खान्देशच्या दौºयावर आहेत. सर्वप्रथम पाळधी येथे त्यांनी शेतकºयांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.जळगाव विमानतळावर उध्दव ठाकरे यांचे स्वागत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले. यावेळी ठाकरे यांनी सुरेशदादा यांच्या तब्येतीची विचारणा केली. त्यानंतर ते पाळधीकडे रवाना झाले.पाळधीत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करीत एक चांगला शिवसैनिक दिल्याबद्दल पाळधीकरांचे आभार मानले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. अवघे तीन मिनिटे त्यांनी संवाद साधला व ते धरणगाव येथे होणाºया सभेसाठी रवाना झाले.