लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.6 : तालुक्यातील बोरी धरणात पाण्याचा अवैध उपसा करणा:या 21 शेतक:यांच्या विद्युत मोटारी (पंप) जप्त करण्यात आल्या आहेत. तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाने सोमवारी ही कारवाई केली. बोरी धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असतानांही काही शेतक:यांनी त्या ठिकाणी विद्युत मोटारी ठेवून उपसा करीत होते. सोमवारी त्या ठिकाणी धाड टाकण्यात येऊन 21 मोटारी जप्त करण्यात आल्या. पारोळा शहर व अन्य गावाना पाणी पुरवठा करणा:या बोरी धरणात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ मृतसाठा शिल्लक आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होणार आहे, म्हणून नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत आमदार डॉ. सतिश पाटील यांनी जे शेतकरी आपल्या फायद्यासाठी अवैधपणे पाण्याचा उपसा करीत असतील त्यांच्या मोटारी जप्त कराव्यात असे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार श्वेता संचेती यांच्या आदेशाने सोमवारी बोरी धरणावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांनी धाड टाकली असता त्या ठिकाणी 21 शेतक:यांच्या विद्युत मोटारी पाणी उपसा करतांना आढळल्या. त्यात तामसवाडी, बोळे, करमाड, वेल्हाणे ह्या गावातील शेतक:यांच्या या मोटारी होत्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील इतर ठिकाणी असलेल्या धरणांवर देखील अश्याप्रकारे छापे टाकण्यात येतील व मोटारी जप्त करून कार्यवाही करण्यात येईल. त्या आधी शेतक:यांनी स्वत:हून आपल्या मोटारी उचलून घ्याव्या असे आवाहन तहसीलदार , पाटबंधारे विभागाकड़ून करण्यात आले आहे. बोरी धरण शाखेचे अभियंता विजय जाधव, शाखाधिकारी व्ही. एम. पाटील, व्ही. एम. कुमावत, वाय एस देवरे, के. एम. खांडेकर, एम. आर. सुतार, किरण वायरमन, नगरपालिका, विद्युत विभाग, तलाठी आदि विभागाच्या कर्मचा:यांना बोलावून ही कारवाई करण्यात आली.
बोरी धरणातून अवैधपणे पाण्याचा उपसा करणा:या 21 शेतक:यांच्या विद्युत मोटारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 6:59 PM
पाणीटंचाईचे भीषण सावट पसरलेल्या पारोळा तालुक्यातील बोरी धरणातून विद्युत मोटारी (पंप) लावून पाण्याचा उपसा करणा:या शेतक:यांच्याविरोधात महसूल आणि पाटबंधारे विभागाने सोमवारी धडक कारवाई केली.
ठळक मुद्देतहसीलदारांच्या आदेशाने पाटबंधारे व विविध विभागाच्या कर्मचा:यांची धडक कारवाईचार गावातील 21 शेतक:यांच्या मोटारी जप्तइतर धरणांवर देखील कारवाईचा इशारा.